जि.प.निवडणुकीत जनशक्ती सर्व जागा लढवणार : ॲड.काकडे.

- Advertisement -

अमरापूर प्रतिनिधी – निकट फलके

शेवगाव तालुक्याचे राजकारणात अनेकांनी वंशपरंपरेने पद भोगले आहेत. त्यामुळे तालुक्याचा विकास खुंटला.आता जनतेने तिसरा पर्याय निवडला पाहिजे. म्हणूनच जनशक्ती आता आगामी जि.प.निवडणुकीत सर्व गटातून निवडणूक लढवणार असल्याचे आव्हान ॲड.शिवाजीराव काकडे यांनी राणेगाव येथे केले.

जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांच्या विकास निधीतून मंजूर मौजे राणेगाव ते आधोडी रस्‍ता मजबूतीकरण व डांबरीकरण कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शहादेव खेडकर हे होते तर कार्यक्रमासाठी जि.प.सदस्या सौ.हर्षदा काकडे, देवराव दारकुंडे, भाऊसाहेब सातपुते, विष्णू दिवटे, सुरेश कापसे, भाऊसाहेब पोटभरे, भारत कापसे, नवनाथ तांबे, अशोक कणसे, भागवत रासनकर, अमर राजेभोसले, सतीश दसपुते, गोरक्ष गव्हाणे, नितीन घोरपडे, बाबा खंडागळे, फारुख शेख, जालिंदर कापसे, पांडुरंग वाघ, अंबादास गाढवे, अर्जुन तिडके, नारायण तिडके, नवनाथ खेडकर, पप्पू विघ्ने आदि प्रमुख उपस्थित होते.

पुढे बोलताना ॲड.काकडे म्हणाले की,तालुक्यात तिसरी शक्ती उभा राहू शकते तिला बळ देण्याचे काम आता आपणास करायचे आहे. सर्वसामान्यांचं पोरगं सभापती होऊ शकते. वंशपरंपरा आता आपल्याला मोडून काढायची आहे. युवकांचे भवितव्य घडवायचे असेल तर उद्योग व्यवसायाची मालिका तालुक्यात उभी करावी लागेल असेही ते बोलताना म्हणाले.

सौ.काकडे म्हणाल्या की, कोणतिही निवडणूक करण्यापूर्वी आम्ही जनतेला विचारतो.मगच निवडणूक करतो.माझ्या कामाची धास्ती विरोधकांनी घेतली आहे.जर मी या गटात काम करू शकते तर इतर गटात कामे का होऊ शकत नाहीत.त्यामुळे आता जनतेने आपला पर्याय बदलला पाहिजे असे त्या बोलताना म्हणाल्या.

 

आम्ही आजपर्यंत प्रत्येकाच्या दाराची उंबरठे झिजवले परंतु आमच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. सौ.काकडे ताई यांनी आमचे रस्ते पाणी आणि वीजप्रश मार्गी लावले. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या पाठीमागे एकजुटीने उभे राहणार आहोत. – पांडुरंग वाघ

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles