युवकांचा रक्तदान व अन्नदानाचा उपक्रम दिशादर्शक – आ.संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- जुना बजार येथील एफ.जे. ग्रुपच्या वतीने मोहंमद पैगंबर जयंती (ईद मिलादुन्नबी) निमित्त भाविकांसाठी भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते. भंडार्याचे प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रुपचे अध्यक्ष बाबासाहेब जहागीरदार, रोटरीचे माजी अध्यक्ष रफिक मुन्शी, उबेद शेख, जफर भैय्या, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, फारुक बागवान, फैज शेख उमर, अरफात जहागीरदार, फैसल बागवान, जुबेर शेख, अदनान बागवान, अमान बागवान, फराज खान, दानिश जहागीरदार, तौसिफ बागवान, अब्रार शेख, अयान बागवान, नबील बागवान, साद शेख, अकिल शेख, फारुक बाबा, जिशान बागवान आदी उपस्थित होते.
मुस्लिम समाजबांधवांनी शहरात मोठ्या प्रमाणात अन्नदान व रक्तदान करुन मोहंमद पैगंबर जयंती साजरी केली.युवकांनी रक्तदान व अन्नदानाचा राबविलेला उपक्रम दिशादर्शक आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जपत शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले.
कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. युवकांच्या रक्तदानाने हा तुटवडा भरुन निघण्यास मदत होणार आहे. तसेच भाविकांसह गरजू घटकांना देखील अन्नदान करुन त्यांना एकप्रकारे आधार देण्याचे काम युवकांनी केले.
एफ.जे. ग्रुपच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. एफ.जे. ग्रुपच्या सदस्यांनी अल फताह सोशल क्लबने राबविलेल्या रक्तदान शिबीरात रक्तदान करुन, भाविकांसाठी भंडार्याचे आयोजन केले होते.