जोगेश्वरीत पुन्हा एकदा “कोकण नगर प्रीमियर लीग २०२१ चे आयोजन”

0
75

केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांच्या हस्ते नारळ फोडून केली स्पर्धेची सुरवात

मुंबई : मुंबईत कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस कमी होताना पाहायला मिळतो आहे त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध ही शिथिल केले आहेत. त्यामुळे मुंबईकरांमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण होताना पाहायला मिळते आहे.

मुंबईत ठिकठिकाणी आता समारंभ, पूजा, मैदानी खेळ आदींचे आयोजन करण्यास पुन्हा एकदा सुरूवात झाली आहेत. दरम्यान २ वर्षानंतर जोगेश्वरीतील प्रसिद्ध अश्या “कोकण नगर प्रीमियर लीग २०२१” चे पुन्हा एकदा आयोजन कोकण नगर परिसरात केले गेले.परिसरातील तरुणांना एक विरंगुळा म्हणून या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

यावेळी केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांच्या हस्ते नारळ फोडून लीगची सुरुवात करण्यात आली तर शिवसेना कार्यकर्ते सुनील मस्कर व आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.

या खेळासाठी मेघवाडी पोलीस ठाणेचे विशेष सहकार्य लाभले तर प्रभाग क्रमांक ७७ चे नगरसेवक बाळा नर तसेच भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते धर्मेंद्रनाथ ठाकूर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान या संपूर्ण स्पर्धेचे नियोजन अतिष गुज्जर, ओमकार तिरोडकर, अभिजित निकम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here