ज्या किल्ल्यांवर इतिहास घडला ते किल्ले जपणे गरजेचे – जि.प.अध्यक्षा घुले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

स्नेहबंध फाउंडेशनतर्फे किल्ले बनवा स्पर्धेचे पारितोषिक वितरण

 

अहमदगनर – गड-किल्ले हेच महाराष्ट्राचे खरे वैभव आहे. त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पुढच्या पिढीला इतिहास सांगायचा असेल,तर इतिहास ज्या किल्ल्यांवर घडला ते किल्ले जपणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.

स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने दिवाळी निमित्त घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हा परिषदेच्या सभागृहात पारितोषिक वितरण करण्यात आले.यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती उमेश परहर, सभापती काशिनाथ दाते, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, स्नेहबंध चे अध्यक्ष उद्धव शिंदे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, भास्कर पाटील, सचिन पेंडूरकर, संकेत शेलार, हेमंत ढाकेफळकर आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत पहिला क्रमांक महावीर पारस गुंदेचा, विनायकनगर,द्वितीय प्रदुम्न योगेश करांडे, वाघस्कर गल्ली, तृतीय स्वराज सुनील हिवाळे, कृष्णा दुर्गाप्रसाद राठोड, नगर, जयदीप संतोष नाबरिया, कायनेटिक चौक यांनी पटकावला,तर कार्तिक गोरख वाघ, बालिकाश्रम रोड, रोनक सागर गुंदेचा यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

जि.प.अध्यक्ष घुले म्हणाल्या, महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन होणे, ही काळाची गरज आहे. शिक्षकांनी विद्यार्थांना शिवराय आणि त्यांच्या गड व किल्ल्यांचा इतिहास वेळोवेळी समजावून सांगितल्यास मोठी जागृती होऊ शकते.

स्नेहबंध चे अध्यक्ष शिंदे म्हणाले, मुलांच्या मनात असलेले गडकिल्ले ते प्रत्यक्षात साकारण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळे त्यांच्या प्रयोगशीलतेला आणि कल्पकतेला वाव मिळतो.या किल्ले बनवा स्पर्धेतून महाराष्ट्राचा मराठमोळ्या इतिहास संस्कृतीची आठवण ताजी होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!