ज्या नागरीकांचा लसीचा पहिला डोस राहिलेला आहे त्यांनी लस घेतल्यास त्यांना टीव्ही, फ्रिज, पिठाची गिरणी, कुकर, मिक्सर, पंखा अशी जवळपास ४२ बक्षिसे जिंकण्याची संधी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

जामखेड प्रतिनिधी – नासीर पठाण

जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागाचे ७२ टक्के लसीकरण पूर्ण झालेले आहे.परंतु अद्यापही २८ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही.ग्रामीण भागामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये लस घेण्याबाबत गैरसमज दिसून येतात.

प्रशासन लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करून शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.मात्र त्याला म्हणावे तेवढे यश मिळत नाही.त्यामुळे पंचायत समिती जामखेडने एक आगळा वेगळा उपक्रम १००% लसीकरण होण्यासाठी राबवलेला आहे.

ज्या नागरीकांचा लसीचा पहिला डोस राहिलेला आहे त्यांनी लस घेतल्यास त्यांना टीव्ही, फ्रिज, पिठाची गिरणी, कुकर, मिक्सर, पंखा अशी जवळपास ४२ बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकारी यांनी लोकसहभागातून ही बक्षीस योजना सादर केलेली आहे.

१२ डिसेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत लसीकरण करून घेणाऱ्यांना (फक्त पहिला डोस) ही संधी उपलब्ध आहे.१ जानेवारी २०२२ रोजी पंचायत समिती जामखेड येथे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या लकी ड्रॉ स्पर्धेची सोडत आयोजित करण्यात आलेली आहे.

यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षीस वाटप कार्यक्रम घेण्यात येईल. प्रथम बक्षीस- फ्रीज, द्वितीय- पिठाची गिरणी, तृतीय- LED TV, चतुर्थ- पंखा-५, पाचवे- मिक्सर ५, सहावे- कुकर ५, सातवे- इस्त्री ५, आठवे- टिफिन २० अशी एकूण ४३ बक्षिसे दिली जाणार आहेत.

या उपक्रमासाठी आमदार रोहितदादा पवार,सभापती राजश्री मोरे,उपसभापती मनीषा सुरवसे,पंचायत समिती सदस्य सदस्य डॉ.भगवान मुरूमकर,प्रा.सुभाष आव्हाड,जिल्हा परिषद सदस्या वंदना लोखंडे,सोमनाथ पाचर्णे यांनी मदत केली.

या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार योगेश चंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.

या उपक्रमाचा लाभ घेऊन सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आव्हान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांनी केले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!