झेंडीगेट सोशल क्लबच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन.
कोठला येथे गोळीबार करून मारहाण करणाऱ्या आरोपींची पार्श्वभूमी बघता तात्काळ अटक करुन मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी.
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मंगलगेट परिसरातील कोठला येथे सरवर शेख यांच्यावर झालेल्या गोळीबार व हल्ला करणारे आरोपी धन्या उर्फ दानिश शेख, साहिल भाऊ, लाला, गणेश पोटे उर्फ टिंग्या, तालीब व इतर आरोपी यांच्याविरुद्ध ३०७ कलम व गोळीबार करून घातक शास्त्राचा वापर करून गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणात आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहे व परिसरात दहशत, दमदाटी, खंडणी, जिविताचे नुकसान, मालमत्तेचे नुकसान अशा प्रकारे गुन्हे व बेकायदेशीर कारवाया बाबतचे रेकॉर्ड शहरातील पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध आहे. आरोपी सराईत असून अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी झेंडीगेट सोशल क्लबच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे. यावेळी सोशल क्लबचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये व परिसरात वातावरण अतिशय नाजूक असून लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर अनेक राजकीय तसेच सामाजिक नेते शहरांमध्ये येत आहे त्या परिस्थितीत पोलीस यंत्रणा ही केवळ त्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे भासवून गुंडांना व सराईत गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे व आरोपी हे पुन्हा शहरांमध्ये प्राण घातक हल्ले करून नागरिकांचे जीवितच धोका निर्माण करण्याची पुरेपूर शक्यता असल्याने त्यांचे विरुद्ध तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी व आरोपी शहरांमध्ये खुलेआम बिनधास्तपणे फिरत असून त्यांचे मोबाईल चालू आहे. तसेच सोशल मीडियावर देखील ते कार्यरत आहे. यावरून कायद्याचा धाक त्यांना राहिलेला नाही हे दिसून येते व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघता त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यानुसार तत्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा शहरातील अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चे काढण्यात येणारा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.