- Advertisement -
कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती तसेच आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस व वडिलांची पुण्यतिथी अशा पद्धतीने त्रिवेणी संगम एकत्र करत येथील शिक्षक नयुम शेख यांनी ५०० विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले.

वाचाल तर वाचाल या उपक्रमाचा वापर सर्वत्र व्हावा या उदात्त हेतूने शिक्षक नईम शेख यांनी त्यांचे वडील दिवंगत शिक्षक गुलाबभाई कादरभाई शेख यांची पुण्यतिथी तसेच रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती व पुढील काही दिवसांनी आमदार रोहित पवार यांचा होणारा वाढदिवस या निमित्ताने कर्जत शहर व तालुक्यातील शाळांमध्ये व झोपडपट्टी व गोरगरिबांच्या वस्तीवर जाऊन नईम शेख यांनी पाचशे पुस्तकांचे वाटप केले त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
- Advertisement -