झोपडी कॅन्टींग येथील क्रिस्टल हॉस्पिटल अँड रीसर्च सेंटरचे उद्घाटन संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नगर शहर हे आरोग्यसेवेचे मंदिर बनले आहे – आ.संग्राम जगताप

अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी

मानवी जीवनाच्या दृष्टीने आरोग्य सेवेला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. नगर शहरातील डॉक्टरांनी कोरोनाच्या काळात केलेले कार्य कौतुकास्पद आहे.क्रिस्टल हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकी जोपासत आरोग्यसेवेत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. वैद्यकीय सेवेत दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून निदान केले जाते, ग्रामीण भागामध्ये आजही कोरोनाचे रुग्ण सापडत आहे ही चिंतेची बाब आहे नगर शहर हे मुख्य आरोग्य केंद्र बनले आहे त्यामुळे नगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात क्रिस्टल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आरोग्य सेवेतून रुग्णांचा विश्वास संपादन केला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

झोपडी कॅन्टींग येथील क्रिस्टल हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे उद्घाटन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून आ.संग्राम जगताप बोलत होते यावेळी डॉ.अनिल आठरे,डॉ.सतीश सोनवणे,डॉ.अमित बडवे,डॉ.अभिजित पाठक,डॉ. बापुसहेब कांडेकर,नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे,संचलक गणेश फसले,डॉ.जितेंद्र ढवळे,डॉ.जितेंद्र शेंडे, डॉ.भूषण वराट,डॉ.दीपक कळमकर,डॉ.युवराज टकले,अशोक खोकरले,गोरख पडोळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ.जितेंद्र ढवळे म्हणले की,आम्ही सर्व डॉक्टरांनीही एकत्रित येऊन क्रिस्टल हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्यसेवा सुरू केली आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोग करून रुग्णांवर यशस्वीरित्या निदान व उपचार केले जात आहे. आमचे ६० बेडचे हॉस्पिटल असून यामध्ये २० बेड आय.सी.यु तसेच १२ बेडचे व्हेंटिलेटर कक्ष व दोन ऑपरेशन थेटर तसेच अनुभवी डॉक्टरांची टीम आदींसह सर्व आरोग्य सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे आम्ही ‘ वचन प्रेरणादायी आरोग्याचे’ या ब्रीद वाक्य च्या माध्यमातून रुग्णांची सेवा करतो असे त्यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाचे स्वागत डॉ.युवराज टकले यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक गणेश फसले यांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!