टू-बी एच.के-अलफ्रेस्को आयोजित “होळी काऊ” कार्यक्रमास पुण्यातील हजारो तरुणाई थिरकली – बॉलीवूड सिगर्सच्या च्या तालावर..
पुणे – टू-बी एच.के अलफ्रेस्को आयोजित भारतातील पारंपरिक अश्या होळी सणाचे औचित्य साधून होलिकोत्सवनिमित्त “होळी काऊ” या भव्य दिव्य अश्या सोहळ्याचे आयोजन मिल्स पुणे येथील भव्य अश्या खुल्या मैदानावर नुकतेच करण्यात आले होते.या “होळी काऊ” या कार्यक्रमास सुमारे १२ हजार रसिकांनी सक्रिय उपस्थिती दर्शवून या सोहळ्याचा आनंद लुटला.
बॉलीवूड जगतातील सुप्रसिद्ध सिंगर-होळी स्पेशल बी.पर्क,विनी-विसी,डी.जे.चितास यांच्या गाण्यांच्या व संगीताच्या तालावर उपस्थित हजारो रसिकांनी या होलिकोत्सवाचा आनंद लुटला.कार्यक्रमास पुण्यातील हजारो तरुणाई थिरकली या अगोदर हि बौलिवूडचे प्रसिद्ध सिंगर अर्जितसिंग यांच्या हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमासही रसिकांच्या गर्दीचा अभूतपूर्व असा उच्चांक झाला होता.सुमारे ४० हजार रसिकांनी यात सहभाग दिला होता.याचेही आयोजन टू-बी एच.के अलफ्रेस्को यांच्या वतीने करण्यात आले होते.
टू-बी एच.के अलफ्रेस्कोचे संचालक हेरंब शेळके व त्यांचे सहभागी सहकारी प्रतीक देशमुख,निलेश वाघमोडे,विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली “होळी काऊ” कार्यक्रमाचे यशस्वीपूर्वक आयोजन करण्यात आले होते.कोल्हापूर येथील प्रथितयश उद्योजक हेरंब शेळके यांच्या चांगल्या जनसंपर्कामुळे,नियोजनबद्धता व विश्वासार्हतेमुळे बॉलीवूड स्टार्स,गायक हे पुण्यातील विविध कार्यक्रमासाठी येत आहेत.त्यामुळे पुणेकरांना या बॉलीवूड स्टार्सना पाहण्याची,अनुभवण्याची,संवाद साधण्याची,त्यांना ऐकण्याची संधी प्राप्त होत आहे.
हि बाब उल्लेखनीय अशीच असून या” होळी-काऊ”च्या यशस्वी व भव्य आयोजनामध्ये श्वेता मेहेता,विक्रम गॉर्जिया,यश शाह व अनेक सहकाऱ्यांचा समावेश होता.