डाळिंबावरील तेलकट डाग रोगाचे नियंत्रण सहजशक्य,कार्यशाळा संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी

नगर तालुक्यातील डाळिंबाच्या बागेवर तेलकट डाग रोगाचा प्रार्दूभाव झालेला असला, तरी तो सध्या तो नियंत्रणात आहे. या रोगाचे व्यवस्थापन करणे सहज शक्य आहे. तालुक्यातील डाळिंब बागायतदारांनी घाबरून न जाता एकात्मिक रोग व्यवस्थापन या तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. डाळिंब बागायतदारांनी योग्य औषधांची निवड करून फवारणी करावी. फवारणी करताना औषधातील घटकांची माहिती करून घ्यावी, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व तालुका कृषी अधिकारी, नगर कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नगर तालुक्यातील अरणगाव, खडकी, बाबुर्डी, पिंपळगाव उजनी, हिंगणगाव व जखणगाव या गावांतील डाळिंब उत्पादकांच्या बागेला भेटी देण्यात आल्या. याप्रसंगी डाळिंब पिकावरील तेलकट डाग व मर रोग व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळा घेण्यात आल्या. यावेळी श्री. मोरे बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. अशोक वाळुंज, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, विजय सोमवंशी यांच्यासह डाळिंब बागायतदार शेतकरी उपस्थित होते.

डॉ. मोरे पुढे म्हणाले की, चालू हंगामातील फळे काढणीनंतर बाग विश्रांती कालावधीत बहाराचे पूर्व नियोजन योग्य पद्धतीने करावे. झाडामधील रोग प्रतिकारक्षमता वाढवणे आवश्यक आहे. यावेळी योग्य औषधाच्या फवारण्या घेणे आवश्यक आहे. योग्य फवारण्यांचा उपयोग होऊन पुढील बहारामध्ये रोगाचे नियंत्रण करणे सहजशक्य होईल, असे ते म्हणाले.
डाळिंब बागेचे योग्य व्यवस्थापन केल्यास तेलकट व मरसारख्या रोगांवर नियंत्रण मिळविता येईल, असे विद्यापीठाचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. अशोक वाळुंज यांनी सांगितले.

एकात्मिक रोग व्यवस्थापन करून डाळिंब उत्पादक शेतकरी तेलकट डाग रोगावर नियंत्रण करू शकतात. त्यामुळे कोणत्याही शेतकर्‍याने डाळिंबाची बाग तोडू नये, असे आवाहन यावेळी तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी शेतकर्‍यांना केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!