डिग्रस प्रकरणात शौर्य दाखविणारे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांचा गौरव

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

घर घर लंगर सेवा,लायन्स क्लब व हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने डिग्रस प्रकरणात शौर्य दाखविणारे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांचा गौरव

मिटके यांनी डिग्रस प्रकरणात खाकी वर्दीचा अभिमान उंचावला -हरजितसिंह वधवा

अहमदनगर प्रतिनिधी – डिग्रस प्रकरणात जीव धोक्यात घालून आरोपीच्या तावडीतून मुला-मुलींसह कुटुंबाची सुखरुप सुटका करुन शौर्य दाखविल्याबद्दल श्रीरामपूरचे विभागीय पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांचा शहरात घर घर लंगर सेवा,लायन्स क्लब व हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने गौरव करण्यात आला.हॉटेल अशोका येथे लंगर सेवेच्या ठिकाणी मिटके यांचा सन्मान सोहळा पार पडला.

यावेळी घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, जनक अहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, अजय पंजाबी, हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानचे मन्सूर शेख, प्रशांत मुनोत, किशोर मुनोत, राहुल बजाज, सतीश गंभीर, दामोदर माखिजा, करण धुप्पड, कैलाश नवलानी, गोविंद खुराणा, अनिश आहुजा, शरद बेरड, पुरुषोत्तम बेट्टी, मनु कुकरेजा, विपुल शाह, सुनील थोरात, पंडित मुन्ना शर्मा, प्रमोद पंतम, सिमर वधवा आदी उपस्थित होते.

हरजितसिंह वधवा म्हणाले की, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी डिग्रस प्रकरणात खाकी वर्दीचा अभिमान उंचावला.पुणे येथील बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील लोखंडे याने पिस्तोलचा धाक दाखवून एका महिलेसह तिच्या दोन मुलांना ओलीस धरले होते. अशा परिस्थितीमध्ये मिटके व त्यांच्या पथकाने निशस्त्रपणे त्या आरोपीचा सामना करुन त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले.

यामध्ये त्यांच्यावर गोळी देखील आरोपीने चालवली यामध्ये ते थोडक्यात वाचले.जिवाची पर्वा न करता त्यांनी दाखवलेले शौर्याने पोलीसांप्रती असलेला सन्मान आनखी वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.जनक अहुजा यांनी संदीप मिटके हे घर घर लंगर सेवेचे एक सदस्य आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेत जेंव्हा लंगर सेवा सुरु झाली तेंव्हापासून ते या सेवेशी जोडले गेले.

सामाजिक सेवेचा वसा घेतलेले पोलीस अधिकारी मिटके यांनी कर्तव्य बजावून धाडस दाखवल्याचे त्यांनी सांगितले.पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी राहुरी येथील डिग्रस येथे घडलेला थरार आपल्या शब्दात कथन करुन सर्वांच्या आशिर्वादाने जीवावर बेतले नसल्याचे स्पष्ट केले.आभार प्रितपालसिंह धुप्पड यांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!