डिसेंबर महिन्यामध्ये कर्जत तालुक्यात आणखी एक राजकीय भूकंप – राम शिंदे

0
124

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

डिसेंबर महिन्यामध्ये कर्जत तालुक्यात आणखी एक राजकीय भूकंप होणार,असा गौप्यस्फोट राज्याचे माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी कर्जत येथे बोलताना केला.

कर्जत येथील संतोष गोरे व सचिन गोरे यांनी कर्जत इथे जय भवानी फेवर ब्लॉक व सिमेंट प्रोडक्ट कंपनी स्थापन करून त्याचे उद्घाटन माजी मंत्री राम शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,श्री व श्रीमती काकडे गुरुजी यांच्या हस्ते केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत,प्रतिभा भैलुमे,उषा राऊत,बापूसाहेब नेटके,संतोष मेहेत्रे,दादासाहेब सोनमाळी,सचिन घुले,राजेंद्र जगताप,काकासाहेब धांडे,अनिल गदादे,काका ढेरे, यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक व्यापारी क्षेत्रात या वेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री राम शिंदे म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना मी डबल शुभेच्छा देणार आहे,पहिली डिसेंबर पर्यंत ची शुभेच्छा आहे आणि त्यानंतर पुढील वर्षासाठी एक शुभेच्छा आहे. या काय शुभेच्छा आहे राजेंद्र फाळके यांना चांगल माहीत आहे असे म्हणताच उपस्थित सर्वांनी जोरदार हशा,टाळ्या वाजवल्या.

शिंदे पुढे म्हणाले की फाळके हे माझ्या शुभेच्छा जाहीर पणे स्विकारत नाहीत,मी एक घर बांधले तर लोकांनी आमचा कार्यक्रम केला.मात्र तुम्ही काही बांधा,तुम्हाला अडचण नाही म्हणत पुढच्या शुभेच्छा दिल्या.

कर्जत शहर हे टपऱ्या यांची ओळख असलेले होते.मात्र आपण सर्वांनी केलेल्या एकत्र विकास कामांमुळे आता कर्जत मध्ये चांगले शोरूम होऊ लागले आहेत आणि नागरिक देखील गुंतवणूक करत आहेत.त्याचप्रमाणे शहरातील जागांच्या किमती देखील भरमसाठ वाढल्या आहेत.संतोष गोरे यांनी देखील या ठिकाणी पंधरा वेगवेगळे प्रोडक्शन सिमेंट मध्ये तयार करण्याचा कारखाना सुरू केला आहे हा मोठा बदल आहे,असे राम शिंदे बोलताना म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बोलताना सांगितले की, कर्जत येथे संतोष व सचिन गोरे या युवकांनी पुढाकार घेत या ठिकाणी उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचे मोठे धाडस दाखवले आहे.यामुळे तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना शहरी भागांमध्ये न जाता कर्जत मध्ये सिमेंट चे सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध होणार आहेत.माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांचे भाषण झाले.आभार संतोष गोरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here