अहमदनगर प्रतिनिधी – विजय मते
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर आणि नगर जिल्ह्यातील सर्व अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रांगोळी, वैयक्तीक गीत गायन, पोस्टर स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पाडल्या.यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला.
वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे डी.एड्. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत ट्रॉफी, प्रमाणपत्रे मिळवून कॉलेजचे नाव जिल्हाभर झळकविले. यामध्ये प्रथम वर्षाच्या विद्या कबाडी हिने पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविला तर प्रांजल रेपाळे हीने रांगोळी तर पुजा भोसले हीने वैयक्तीक गायन स्पर्धेत बक्षिसे मिळविली. संगमनेर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डी.एड्. कॉलेजचे प्राचार्य भगवान खारके यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या नेत्रदिपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विनय पाउलबुधे, विश्वस्तांसह बी.एड्.च्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, डी.एड्.च्या प्राचार्या सविता सानप, स्पर्धांसाठी मार्गदर्शन करणार्या प्रा.मिरा डिमळे, तसेच डी.एड्., बी.एड्. महिला व रात्र महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकवृंदांनी अभिनंदन केले. या विजेत्या स्पर्धकांचा कॉलेजमध्ये सत्कार करण्यात आला.