- Advertisement -
डॉ. पानसरे चेस्ट क्लिनिकच्या वतीने व्हेरिकोज व्हेन लेझर उपचार शिबिरात 300 रुग्णांनी घेतला लाभ
व्हेरिकोज व्हेनच्या रुग्णांनी आपल्या आजाराकडे दुर्लक्ष न करत उपचार करून घ्यावे – डॉ. हेमंत चौधरी
नगर : नागरिकांमध्ये सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये व्हेरिकोज व्हेनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे सर्वसामान्य नागरिकांना उपचार मिळावेत यासाठी डॉ. पानसरे चेस्ट क्लिनिकच्या माध्यमातून नगर शहरात व्हेरिकोज व्हेन लेझर उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या उपचार शिबिरात नगर, पुणे, बीड, लातूर येथील 300 रुग्णांनी घेतला लाभ घेतला. व्हेरिकोज व्हेनच्या रुग्णांनी आपल्या आजाराकडे दुर्लक्ष न करत उपचार करून घ्यावे, असे आवाहन रक्तवाहिनी स्पेशलिस्ट डॉ. हेमंत चौधरी यांनी केले.
डॉ. पानसरे चेस्टक्लिनिक इथे हॉटेल ओबेराय मीरा मेडिकल शेजारील साईड येथे आयोजित पुणे येथील प्रसिद्ध रक्तवाहिनी स्पेशलिस्ट डॉक्टर हेमंत चौधरी यांच्या व्हेरिकोज व्हेन लेझर उपचार शिबिराचे उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार, उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले, यावेळी डॉ. सचिन पानसरे, डॉ. रणजित सत्रे यांच्यासह रुग्ण उपस्थित होते.
पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आरोग्य सुविधेत बदल झाले असून सर्व सामान्य रुग्णांना उपचार मिळावे यासाठी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन होणे गरजेचे आहे, आता पुणे मुंबई येथील आरोग्य सुविधा नगरमध्ये उपलब्ध झाल्या आहेत, रक्तवाहिनी स्पेशलिस्ट डॉ. हेमंत चौधरी हे व्हेरिकोज व्हेन या आजारावर योग्य ते उपचार करत असून त्यांनी नगर शहरात शिबिराचे आयोजन करून रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.
- Advertisement -