डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आगळावेगळा उपक्रम.
पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस भरती सराव परीक्षा संपन्न.
500 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग.
अहमदनगर (प्रतिनिधी)- महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त गणेश केदारे मित्र मंडळाच्या वतीने ईतर खर्चाला फाटा देत एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून शहरामध्ये विविध अकॅडमी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व पोलीस भरती सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी न्यू आर्ट्स कॉलेज मैदान येथे मोफत पोलीस भरती सराव परीक्षा ठेवण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व या स्पर्धेतील विजेते स्पर्धकांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाचे संच देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन गणेश केदारे, ओंकार लेंडकर, सनी साळवे, उद्धव माने, शाबीर शेख, अशोक दगडखैर, विनोद कदम, अनिल घोलप, पंकज खिळे आधी प्रशिक्षक उपस्थित होते.