- Advertisement -
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार संग्राम जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे जनक – आ. संग्राम जगताप
नगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्याय शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. त्यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून संबोधले जाते, त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवरच आजची लोकशाही सुरु आहे, त्याच माध्यमातून सर्वांना न्याय मिळत आहे, त्यांनी जनतेला शिक्षणाचे महत्व पटवून दिले असल्यामुळेच आज सर्वजण शिक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात क्रांती घडवत आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य समाजाला दिशा देणारे आहे असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार संग्राम जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयुक्त डॉ.पंकज जावळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर,प्राध्यापक माणिकराव विधाते, राष्ट्रवादी न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे,अशोक गायकवाड, परिमल निकम, कौशल्य गायकवाड आदी उपस्थित होते.
- Advertisement -