डॉ.विखे अभियांत्रिकीत कार्यशाळा संपन्न
विद्यार्थ्यांना यांत्रिकी विभागात उद्दिष्ट साध्य करण्यासाठी थ्रीडीचे महत्व – अभय राजे
नगर – अॅरडीटीव्ह मॅन्यूफॅक्चरिंग तंत्रज्ञानाचा वापर करतांना विद्यार्थ्यांना यांत्रिकी विभागात उद्दिष्ट साध्य करण्यासाठी थ्रीडी प्रिटींगच्या माध्यमातून एरोस्पेस आणि हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये आता मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. विद्यार्थ्यांनी थ्रीडीचे महत्व लक्षात घेऊन ते तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्सचे सचिव अभय राजे यांनी केले.
विळद घाट येथे डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वयंप्रायोजित अॅथडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग विषयावर तीन दिवस कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे अभय राजे, अ.नगर लोकल सेंटरचे भुषण भागवत, डॉ.विखे फौंडेशनचे उपसंचालक सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय नाईक उपस्थित होते.
यावेळी भुषण भागवत म्हणाले, सध्या यांत्रिक युग आहे, विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन ज्ञान आत्मसात करावे. अॅाडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंगच्या ज्ञानाबरोबर प्रात्याक्षिकांचाही अनुभव मिळेल, असे सांगितले.
प्रा.सुनिल कल्हापुरे म्हणाले, थ्रीडी म्हणजे, डिटर्मिनेशन, डिवोशन आणि डेव्हलपमेंट असे महत्व असल्याने या विभागात चांगला वाव आहे. यावेळी डॉ.कानिफ मरकड यांनी या कार्यशाळेतील विविध उद्दिेष्टांबाबत माहिती दिली.
प्रास्तविकात प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यशाळेत 150 उमेदवारांनी सहभाग नोंदवून लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.रविंद्र नवथर सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापकवृंद यांनी परिश्रम घेतले.
कार्यशाळेतील सर्व उमेदवारांना भावी वाटचालीस संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे, डॉ.खा.सुजय विखे यांनी शुभेच्छा दिल्या.