डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन विद्यार्थ्यांना पुणे येथील कंपनीत नोकरीची संधी

0
114

अहमदनगर प्रतिनिधी – विजय मते

विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकडे लक्ष देतेच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांमधील व्यक्तीत्व विकास, तांत्रिक कौशल्य विकास व संभाषणकौशल्य तसेच विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्षातच चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहते. त्याचाच एक भाग म्हणून डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅतण्ड टेलिकम्युनिकेशन विभागात इन्फोसिस, कॉग्नीझंट, कॅप जेमिनी, असेंचर, अॅलमडॉक्स, टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजी, मग्ना इलेक्ट्रॉनिक्स, पुणे यासारख्या विविध कंपनीमार्फत चतुर्थ वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या.

या ऑनलाईन मुलाखती दरम्यान विद्यार्थ्यांची प्रथम योग्यता चाचणी घेण्यात आली. त्यानंतर तांत्रिक चाचणी आणि प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे इलेक्ट्रॉनिक्स अॅभण्ड टेलिकॉम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांची तीन ते पाच लाख प्रतिवर्ष पर्यंत पगारावर निवड करण्यात आली.

निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे सायली मोरे, आशिष शिंदे, सुकृत कुलकर्णी, ऐश्वर्या पाठक, आकांक्षा केदारी, अंजली नरसाळे, कोमल साठे, पवन उकिर्डे, वृषाली म्याना, अंकिता पवार, ऐश्वर्या गुरव, आदिनाथ चौधरी, प्रतक्षा पालवे, पूजा पुंड, महिला खंडागळे, शीतल दुसाणे, पूनम घनवट, महेंद्र डहारे, चेतन पाचे, शुभम गाडे, दिपाली डोंगरे, सतिष गुंजाळ आदिंचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यार्थी व पालक यांचा महाविद्यालयाच्यावतीने फौंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर टेक्नि. प्रा.सुनिल कल्हापुरे व प्राचार्य डॉ.उदय नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सुनिल कल्हापुरे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन इतर विद्यार्थ्यांनी यामधून प्रेरणा घेवून असेच यश संपादन करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विभागप्रमुख डॉ.अनिता पाटील यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या मुलाखतीच्या यशस्वीतेसाठी ट्रेनिंग अॅाण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.सुदर्शन दिवटे, समन्वयक प्रा.अमोल लांडगे, प्रा.अनिकेत विखे यांनी प्रयत्न केले.

या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आ.राधाकृष्ण विखे पा., मुख्य कार्य.अधिकारी डॉ.खा.सुजय विखे पा, सेक्रेटरी डॉ.बी.सदानंदा, डायरेक्टर टेक्नि.पी.एम.गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here