डॉ. शरद कोलते स्कूल मध्ये लो.टिळक पुण्यतिथी साजरी…

- Advertisement -
अहमदनगर प्रतिनिधी – टिळक यांचे विचार आजच्या पिढीसाठी एक आदर्श ग्रंथ आहे. त्याचा अभ्यास तरुणांनी केला पाहिजे. मुलांना स्वाभिमान शिकवण्यासाठी हे विचार फार महत्वाचे असल्याचे प्रतिपादन प्रा विजय शिंदे यांनी केले. डॉ. शरद कोलते स्कूल मध्ये लो.टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी शाळेच्या शिक्षिका सुनिता तनपुरे, रेश्मा शेख, फिजा शेख, अर्जुन दळवी, ईश्वर तनपुरे विद्यार्थी उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले कि आजचा तरुण सर्वकाही झटपट मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना संयम आणि कष्ट यांची जाणीव होण्याची गरज आहे. लो. टिळकांनी ज्या हाल अपेष्टा सहन केल्या त्या फक्त स्वातंत्र मिळावे यासाठी नाही तर इथली जनता सुखी झाली पाहिजे. इतरांसाठी कष्ट करण्याची भावना प्रत्येकांत निर्माण व्हायला हवी.त्यासाठी टिळकांचे विचार आजच्या पिढीला समजले पाहिजेत. त्यांची पुण्यतिथी साजरी करण्याने त्यांचे विचार आजही जिवंत आहेत हेच अधोरेखित होते.
यावेळी मुलांनी आपल्या भाषांनातून त्यांच्या कार्याचा जीवनगौरव केला. यांच्या महान कार्याची माहिती सांगितली. यामध्ये विराज शिंदे, शिवतेज शिंदे, स्वराज शिंदे, आयुषराजे शिंदे, दिव्यांश भोसले,अनन्या ओव्हाळ, गायत्री शिंदे, राजवीर लांडगे, श्रुती शिंदे, यश ओहळ या मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन रेश्मा शेख यांनी केले तर आभार सुनिता तनपुरे यांनी मानले
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!