कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
रयत शिक्षण संस्थेच्या येथील दादा पाटील महाविद्यालयातील भूगोल विभागाचे प्राध्यापक डॉ.संतोष लगड यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील फॅकल्टी वुईथ हायर पोटॉनशियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ.संतोष लगड यांनी आतापर्यंत भूगोल विषयाची विद्यापीठ अभ्यासक्रमावर आधारित व संदर्भ ग्रंथ अशी एकूण १२ पुस्तके प्रकाशित केली आहेत.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन पत्रिकेत त्यांचे ३४ संशोधननिंबध प्रसिद्ध झाले असून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून १३ संशोधननिंबधांचे त्यांनी सादरीकरण केले आहे.
तसेच युजीसीचा एक लघु प्रकल्प त्यांनी पूर्ण केला असून ते महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेचे ते सदस्य आहेत. डॉ.लगड यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्याथी पीएचडी करत आहेत.
या पुरस्काराबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके,संस्थेच्या जनरल बॉडी व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी डॉ.संतोष लगड यांचा सत्कार केला.
तसेच अॅड.नामदेव खरात,प्रा.भास्कर मोरे,डॉ.संजय ठुबे,डॉ.प्रमोद परदेशी यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेतर सेवकांनी डॉ. लगड यांचे अभिनंदन केले.