डोक्यात हवा जाऊ न देता, पदाधिकार्‍यांनी सर्वांना विश्‍वासात घेऊन काम करावे – सुनिल साळवे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आरपीआयच्या युवक जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी

आरपीआय नगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुकीत मित्र पक्षाबरोबर राहणार

आढावा बैठकित विविध विषयांवर चर्चा

 

अहमदनगर(प्रतिनिधी)- सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आरपीआय पक्षाने ताकत देऊन पत व प्रतिष्ठा दिली. अनेक कार्यकर्ते पक्षात काम करुन मोठे झाले व अनेक पदे भुषवली.पद मिळाल्यानंतर डोक्यात हवा जाऊ न देता,सर्व पदाधिकारी यांना विश्‍वासात घेऊन काम करण्याचे आवाहन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले.

तर जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुकांना सामोरे जाताना मित्र पक्षाबरोबर काम करुन ज्या ठिकाणी पक्षाची ताकत आहे, त्या ठिकाणी उमेदवार देऊन सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) जिल्हा पदाधिकारी व सर्व आघाडीच्या प्रमुखांची बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली.यावेळी अध्यक्षीय भाषणात साळवे बोलत होते.

या बैठकिस शहराध्यक्ष किरण दाभाडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय भांबळ, नगरसेवक राहुल कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, भिंगार शहराध्यक्ष आकाश तांबे, तालुका निरीक्षक संजय कांबळे, योगेश त्रिभुवन, कृपाल भिंगारदिवे शाम भोसले, हर्षल कांबळे, विवेक भिंगारदिवे, प्रतिक नरवडे, नितीन साळवे, यशराज शिंदे, विशाल कांबळे, सुरज भिंगारदिवे, जयराम आंग्रे, संदेश पाटोळे, अर्पिता बडेकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कायकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे साळवे म्हणाले की,सक्षम कार्यकर्त्यांना निवडणुकीत तिकीट दिले जाणार आहे.आरपीआय हा एका समाजापुरता मर्यादित नसून,चोवीस आघाड्यांच्या माध्यमातून सर्व समाजाला बरोबर घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने पक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.

पक्षात आमदार,खासदार नसताना केंद्रात दुसर्‍यांदा ना. आठवले यांना मंत्री पदाची संधी मिळाली.ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ताकत आहे.पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी शिस्त व पक्षाच्या चौकटीत राहून काम करावे.पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यास त्या कार्यकर्त्याला मोठी संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

शहराध्यक्ष किरण दाभाडे यांनी कार्यकर्ते व पदाधिकारींनी एकजुटीने काम केल्यास पक्ष बळकट होणार आहे.काही पदाधिकारी फादर बॉडीला विश्‍वासात घेऊन काम करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.तर पक्षाच्या बैठकांना गैरहजर राहणारे व पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊन काम करणार्‍यांची हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली.

संजय कांबळे यांनी जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुकांना सामोरे जाताना सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे सांगितले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन व २५ डिसेंबर रोजी पक्षाचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन सांगितले.
———————–
आरपीआयच्या युवक जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी
पदाधिकार्‍यांच्या आढावा बैठकित युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे यांची सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी जाहीर केले.

काळे यांनी पक्षाच्या लेटरहेडवर हॉस्पिटलच्या तक्रारी करणे, तडजोड करणे, पक्षाच्या बैठकांना गैरहजर राहणे, महिला पदाधिकार्‍यांना विचारात न घेता इतर महिला पदाधिकार्‍यांच्या निवडी करणे तसेच पदाधिकार्‍यांना विचारात न घेता मनमानी पध्दतीने काम केले असल्याचा आरोप केला आहे.त्यांच्या अशा वागण्याने पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष साळवे यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून व माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे, युवक प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे या पदाधिकार्‍यांशी बोलून काळे यांच्यावर सर्वानुमते निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी पत्रात म्हंटले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!