ढोकेश्वर मंदिर रस्त्याचे काम तातडीने करावे – माजी सरपंच शिवाजी खिलारी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पारनेर प्रतिनिधी – निलेश जाधव

तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर ते ढोकेश्वर मंदिर रस्त्याचे काम तातडीने करावे अशी मागणी टाकळी ढोकेश्वरचे मा.सरपंच शिवाजीराव खिलारी यांनी केली आहे.

ढोकेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाल्यामुळे वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे. रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत.श्री ढोकेश्वर मंदिर व देवस्थानचा राज्यभरात नावलौकिक असल्याने मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठीयेत असतात परंतु मंदिराकडे जाणारा रस्ता खराब झाल्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. टाकळी ढोकेश्वर, खामकर झाप,ढोकी या गावातील ग्रामस्थांना देखील या रस्त्याचा रहदारीसाठी वापर असल्याने या रस्त्याचे काम तातडीने होणे गरजेचे आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी तात्काळ लक्ष देऊन सदर समस्या सोडवावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मा.सरपंच शिवाजीराव खिलारी तसेच उपसभापती विलासराव झावरे, संजय झावरे,रोहीदास झावरे, बापुसाहेब रांधवन,धोंडिभाऊ झावरे, किरण झावरे, दिपक साळवे यांनी दिला आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!