- Advertisement -
तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने धम्मतारा बुध्द विहारसाठी धम्म दान
बुध्द विहार समाजातील संस्काराचे केंद्रबिंदू -संजय कांबळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील तथागत बुद्धिस्ट सोसायटी (इंडिया) च्या वतीने धम्मतारा बुध्द विहारसाठी धम्म दान करण्यात आले. धम्मतारा बुध्द विहाराचे समन्वयक संतोषकुमार कदम यांच्याकडे धम्म दानचा धनादेश भन्ते सचितबोधी, भन्ते दिपरत्न, तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे, विजितकुमार ठोंबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला.
पाथरे बुद्रुक (ता. राहता) येथे धम्मतारा बुध्द विहार उभारणीचे कार्य सुरु आहे. या कामाची तथागत बुद्धिस्ट सोसायटी (इंडिया) च्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पहाणी केली. सुरु असलेल्या कामाला हातभार लावण्यासाठी मदतीचा धनादेश देण्यात आला.
संजय कांबळे म्हणाले की, बुध्द विहार समाजातील संस्काराचे केंद्रबिंदू ठरत आहे. बुध्द विहारच्या माध्यमातून समाजाला संस्कारी करण्यासह धर्माचा प्रचार-प्रसार केला जात आहे. तर युवकांना दिशा देण्याचे कार्य सुरु आहे. ग्रामीण भागात उभे राहत असलेल्या बुध्द विहारला हातभार लावण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. भन्ते सचितबोधी यांनी बुध्द विहारच्या कामाबद्दल समाधन व्यक्त करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
- Advertisement -