तबला विशारद प्रथम परीक्षेत लौकिक घोडके केंद्रात प्रथम
अहमदनगर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शास्त्रीय तबला वादन विशारद प्रथम परीक्षेत लौकिक मकरंद घोडके नगर केंद्रात प्रथम आला. पी एम श्री विद्यालय अर्थात केंद्रीय विद्यालय नं, १ मधून इयत्ता १० वी उत्तीर्ण लौकिक हा गुजर गल्ली येथील शिवरंजन संगीतालयाचा विद्यार्थी आहे. लौकिकला बाल पणापासूनच शास्त्रीय संगीताची आवड असून इयत्ता ३ री पासून तो नगरमधील प्रसिद्ध तबला शिक्षक सुरज शिंदे यांच्याकडे तबला शिकतो. त्याला नगरमधील प्रसिद्ध हार्मोनियम वादक प्रकाश शिंदे, गायक प्रा. लक्ष्मणराव डहाळे यांचे देखील मार्गदर्शन लाभले. अहमदनगर केंद्रात तो सर्वप्रथम आला. एप्रिल मे २०२४ सत्रातील ही परीक्षा होती. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
लौकिक घोडके हा नगर मधील मेट्रो न्यूज चॅनलचे संपादक मकरंद घोडके यांचा मुलगा आहे.त्याचे अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाचे रजिस्ट्रार विश्वास जाधव, रसिक ग्रुप चे अध्यक्ष जयंत येलूलकर, सरगमप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष राम शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, मंदार मुळे, जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास भाई मुळे, सचिव कैलास दळवी, शांती ऑडिओचे राजू ढोरे, आकाशवाणी दूरदर्शनचे प्रतिनिधी मनोज सातपुते, शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक कार्याध्यक्ष सुनील गोसावी, संजय गाडेकर, कल्याणी फिरोदिया, तसेच पीएम श्री केंद्रीय विद्यालयाचे विनायक जाधव, आणि कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.
- Advertisement -