तरुणांचे संघटन क्रांती देशात घडवणारे आहे-धनंजय जाधव 

0
45

सकल माळी समाजातर्फे विनोद पुंड व मनोज गाडळकर यांचा सत्कार   

तरुणांचे संघटन क्रांती देशात घडवणारे आहे-धनंजय जाधव   

अहमदनगर प्रतिनिधी अमोल भांबरकर

तरुणांचे संघटन देशात क्रांति घडवणारे आहे. समाजाच्या संघटनेत तरुणांचे संघटन महत्त्वाचे आहे.वेगवेगळे उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांनी नेतृत्व केल्यास समाजाची प्रगती होईल.पुणे येथील माळी समाजाच्या वतीने नगर येथील शोभिवंत कारपेटचे संचालक उद्योजक विनोद पुंड यांना   समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.की नगरकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.मनोज गाडळकर हे युवकांचे मोठे संघटन करतील. असे प्रतिपादन माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी केले आहे.

उद्योजक विनोद पुंड यांना पुणे येथील माळी समाजाच्या वतीने पुणे येथील श्रीसंत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त “महात्मा फुले पुरस्कार” जाहीर झाल्याबद्दल व सकल माळी समाजाच्या युवक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनोज गाडळकर यांचा सत्कार नगर येथील सकल माळी समाज (ट्रस्ट) च्या वतीने करण्यात आला.याप्रसंगी माजी नगरसेवक धनंजय जाधव,बाळासाहेब भुजबळ,डॉ.रणजीत सत्रे,राजेंद्र पडोळे,सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे,अनिल इवळे,भाऊसाहेब कोल्हे,राजेंद्र एकाडे,श्री.बोगा आदी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना विनोद पुंड म्हणाले,मला मिळालेला पुरस्कार हा समाजाचा पुरस्कार आहे.उद्योजक म्हणून १९९० सालापासून व्यवसायाला सुरुवात केली आहे.कार्य करीत असताना समाज नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहे.मला व्यवसाय करताना समाजातील अनेक व्यक्तींनी सहकार्य केले आहे.धनंजय जाधव,स्व.कृष्णा भाऊ जाधव व जाधव परिवारांचे पाठबळ मला नेहमीच लाभले आहे.समाजाने माझा सत्कार केल्याबद्दल मी समाजाचा सदैव ऋणी राहील.

याप्रसंगी जालिंदर बोरुडे,बाळासाहेब भुजबळ,निलेश चिपाडे,मनोज गाडळकर आदींनी मनोगत व्यक्त केले.राजेंद्र पडोळे यांनी आभार मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here