अहमदनगर प्रतिनिधी – अनिल शहा
नगरच्या यश शाह याने नुकत्याच पुणे येथील मॉडर्न कॉम्प्लेक्स येथे १४ ते १८ जुलै रोजी संपन्न झालेल्या योनेक्स-सनराईज प्रायोजित पुणे जिल्हा सिनियर गटाच्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे एकेरीचे उपविजेतेपद तर दुहेरीचे विजेतेपद नरेंद्र गोगावले या खेळाडूच्या साथीने पटकावले.
यश पुणे जिल्हा मेट्रो.पो.बॅडमिंटन असो.चा नोंदणीकृत खेळाडू आहे स्पर्धेत पुण्यातील २७५ खेळाडूंचा सहभाग होता .विशेष म्हणजे यशला या स्पर्धेमध्ये कोणतेही मानांकन नव्हते. तरी त्याने या स्पर्धेततील दुसऱ्या व तिसऱ्या मानांकीत खेळाडूंवर सरळ सेट मध्ये मात करत ऐकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, यश पुणे येथे गेल्या चार वर्षांपासून कोच चैतन्य खानविलकर संचालित सी.के.बी.ये.या बॅडमिंटन अकॅडमीमधे सराव करत असून फिटनेसचे ट्रेंनिंग कोच मिहीर तेहरणीकर याच्या कडे घेतो.
या अगोदर राज्याचे १७ व १९ वयोगटाचे एकेरीचे व दुहेरीचे विजेतेपद हि यशने मिळवले असून राष्ट्रीय पातळीवरील विविध गटातील बॅडमिंटन स्पर्धेत त्याने प्राविण्य मिळवले आहे..अ. भा.पातळीवरील खेलो-इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी यश ची या अगोदर दोनदा निवड झाली आहे.मागील वर्षी नागपूर येथे संपन्न झालेल्या आंतराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात यशला सहभागी होण्याची संधी मिळाली होती.त्याच्या या यशाबद्धल त्याचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
यशच्या पुढील प्रवासासाठी वाडिया पार्क बॅडमिंटन मॉर्निंग व इव्हीनिंग ग्रुपचे सदस्य, पदमश्री पोपटराव पवार,खा.सुजय विखे पाटील,आ.संग्राम जगताप,उद्योजक नरेंद्र फिरोदिया,जिल्हा बॅडमिंटन असो.चे अध्यक्ष ऍड.अशोक कोठारी,जिल्हा क्रीडा अधि. भाग्यश्री बिल्ले,आदीनी अभिनंदन केले आहे.