तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली तुळजाभवानी मंदिरास भेट व पूजा केली.

0
84

अहमदनगर प्रतिनिधी – महेश कांबळे

नगर तालुक्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी आज नगर शहरातील सबजेल चौकातील तुळजाभवानी मंदिराला भेट देऊन तुळजाभवानी देवीची व पलंगाची पूजा केली व कोरोना विषयक घेतलेल्या खबरदारी व नियोजनाची पाहणी केली.

यावेळी मंदिराचे पुजारी बाबूराव,गणेश,अनंत व उमेश पलंगे,साहेबराव पाचारणे उपस्थित होते.

पाटील यावेळी बोलताना म्हणाले भाविक व मंदिर प्रशासन कोरोनाचे  नियम व अटी पाळून नवरात्र साजरे करत आहेत लवकरच कोरोना संपुष्टात येईल अशी आशा आहे कोरोना रुग्ण वाढू न देणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

यावेळी गणेश पलंगे यांनी त्यांचा सत्कार केला व कोरोनाबाबत केलेल्या उपाय योजनेची माहिती दिली तसेच तुळजाभवानीच्या पलंग प्रवास होणार नाही असे सांगून त्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here