महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सौरभ बोरा यांचा सत्कार
अहमदनगर प्रतिनिधी – शहरातली व्यावसायिक श्री सौरभ बोरा यांची आंध्र प्रदेश मधील जगप्रसिध्द मंदिर तिरुपती बालाजी ट्रस्ट वर ट्रस्टी म्हणुन निवड झाली.हा नगरसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
सौरभ बोरा हे नेहमीच धार्मिक कामात पुढे असतात त्यांनी रांजणगाव गणपती,शनिशिंगणापूर,तसेच विशाल गणपती,शिर्डी साईबाबा या देवस्थानात त्यांनी नेहमी धार्मिक कामाच्या माध्यमातुन योगदान दिलेले आहे. त्यांची तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्ट वर ट्रस्टी म्हणुन निवड करण्यात आली आहे.त्या निमित्ताने त्यांचा मनसेचे नितीन भुतारे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
येणाऱ्या काळात त्यांच्या हातून हिंदू धर्माची अशीच सेवा घडो अश्या शुभेच्या देखिल देण्यात आल्या या वेळी केतन नवले, नंदकुमार धाडगे, हर्षल म्हस्के, संकेत व्यवहारे, निलेश भुतारे समर्थ उकांडे, आदी उपस्थित होते.