तेलंगणा राज्यातील हरवलेली बक्काम्मा मानवसेवा प्रकल्पामुळे कुटुंबात.

0
102

तेलंगणा पोलीसांनी केले मानवसेवेचे कौतुक
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
रविवार दि.१४ नोव्हेंबर २०२१ वेळ रात्री १:०० वा.
तेलंगणा राज्यातील एका महिलेने मानसिक भान हरवल्यामुळे अचानक घर सोडले. हरवलेली ही महीला खाजगी वाहनाने ट्रकने थेट अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पोहचली. मारपल्ली पोलीस स्टेशन तेलंगणा येथे दि.१० ऑगस्ट २०२१ रोजी या महिलेची हरवलेबाबत नोंद करण्यात आली. तेलंगणा पोलीसांनी चार महिन्यांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत फुटपाथवर, धार्मिक स्थळे अशा अनेक ठिकाणी शोधले. पोलीसांनी शिर्डी येथील CCTV फुटेज तपासले.एका कॅमेरा मधे दिसली परंतु तेथून हि महिला अहमदनगर शहराकडे आलेली होती. तेलंगणा पोलीसांचे शर्तीचे प्रयत्न सुरूच होते परंतु त्यांना ही मिळून आली नाही.

हरवलेली ही महीला अहमदनगर- पुणे महामार्गावरील कामरगाव परिसरात फिरत होती. अहमदनगर तालुका पोलीस स्टेशन व कामरगाव ग्रामस्थांनी दि.७/०८/२०२१ रोजी मध्यरात्री १२:३० वा. बेघर, निराधार, मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात दाखल केले. मानवसेवा प्रकल्पात अन्न वस्त्र निवारा यामुलभूत सुविधासह मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर व डॉ. सुरेश घोलप यांच्या मार्फत उपचार करण्यात आले.

मानवसेवा प्रकल्पातील उपचारानंतर या निराधार महिलेने तेलगू भाषेत प्रकल्पाचे समन्वयक सुशांत गायकवाड व महिला समुपदेशक पुजा मुठे यांना नाव गाव पत्ता सांगितले. संस्थेने तेलगू  भाषेचे भाषांतर करून महिलेचे कुटुंब शोधले. हि महिला तेलंगणा राज्यातील विक्राबाद जिल्ह्यातील कोठलापूर गावातील असल्याचे समजले.

संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांनी तेलंगणा राज्यातील मारपल्ली पोलीस स्टेशन मधे संपर्क साधला त्यांनी लगेच मिसींग केस असल्याचे सांगितले.

तेलंगणा पोलीसांनी सदर महिलेसोबत व्हीडिओ काॅलद्वारे बोलण्याची विनंती केली आणि खात्री झाल्यावर तेलंगणा पोलीस त्या महिलेच्या नातेवाईकांसह रविवार दि. १४/११/२०२१ रोजी रात्री १:०० वा अरणगाव येथील मानवसेवा प्रकल्पात पोहचून या महिलेला ताब्यात घेतले.

मानवसेवा प्रकल्पाने या मातेला मायेचे उपचार केल्यानंतर आज दि.१४/११/२०२१ रोजी साडीचोळी देऊन सन्मानाने नातेवाईकांच्या व पोलीसांच्या ताब्यात दिले. हरवलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी व तेलंगणा पोलीसांनी अहमदनगर जिल्ह्यातील मानवसेवा कार्याचे भरभरुन कौतुक करीत आभार मानले.

यावेळी संस्थेचे मार्गदर्शक बबन करांडे, महेश पवार, अरणगाव येथील ग्रामस्थ आणि संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ, समन्वयक सुशांत गायकवाड, महिला समुपदेशक पुजा मुठे,  स्वयंसेवक अविनाश पिंपळे,  सुरेखा केदार, सरीता घोडे उपस्थित होते.

*मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here