तोफखान्यात रेड्यांची आणि म्हशींची मिरवणूक,सगर उत्सव संपन्न

0
104

अहमदनगर प्रतिनिधी – महेश कांबळे

येथील जंगूभाई तालमीच्या सिद्धेश्वर तरुण मंडळ व गवळी समाजाच्या वतीने तोफखाना येथे सगर उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर उत्सवात नगर,भिंगार,सर्जेपुरा,तोफखाना,परशाखुंट,गवळीवाडा आदी ठिकाणचे गवळी समाज बांधव आपल्या म्हशी पशुधनास सह आले होते. यावेळी त्यांनी आपल्या म्हशींना सजवून आणले होते.

सिद्धेश्वर तरुण मंडळाच्या वतीने यावेळी गवळी बांधवांचा टोपी,उपकरणे घालून गुलाल लावून व स्टीलची बादली भेट देण्यात आली.यावेळी राजू मामा जाधव,एड.धनंजय जाधव,आदिनाथ जाधव,सुनील सुडके, रोहित डागवाले,प्रतीक गांधी,ज्येष्ठ समाज बांधव मारुती गोंधळे,देवर्षी आप्पा,निस्ताने मामा,बारसे मामा,आसाराम मोधले,माऊली हातगुले,विठ्ठल उदगीकर,सोन्याबापू औशीकर,अंबादास गोडलकर,शंकर हातवलनकर यांच्यासह गवळी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

हा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नगरकर उपस्थित होते,संबोधी विद्यालय ते सिद्धीबाग कॉर्नर या ठिकाणी आलेल्या पशुपालकांनी आपली म्हशी पळवल्या, कार्यक्रमाचे नियोजन पारितोष  वाघुलकर,पुरुषोत्तम सब्बन,गणेश लंगोटे,राहुल गोंधळे,आकाश ताडला,
चिकू उदगीरकर,प्रवीण उदगीरकर,निलेश उदगीरकर, अनिल गोंधळे,संतोष उदगीरकर यांनी केले

राज्यात ठिकठिकाणी दिपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.या सणात आवडत्या वस्तूंची,फराळाची देवाण घेवाण करुन दिपावलीचा सण साजरा होतो.नगर शहरातील गवळी समाज रेड्यांची आणि म्हशींची सगर म्हणजेच मिरवणूक दरवर्षी मोठ्या उत्साहाने काढत असतात.सजवलेले रेडे आणि म्हशीची मिरवणूक काढून आगळा वेगळा सण साजरा केला जातो.असे म्हणतात कि म्हैस हे लक्ष्मीचे रूप आहे,तर रेडा हा यमाचे वाहन आहे.

रेड्याची पूजा केल्याने नवीन वर्षात कुठल्याही अडचणी येत नाही.नगरमध्ये ३ ठिकाणी होणाऱ्या या सोहळ्यात रेड्यांना,म्हशींना  सजवून त्याची मिरवणूक काढली जाते.ढोल तश्यांच्या गजरात रेड्यांचे मालक मोठ्या उत्साहात त्यांची मिरवणूक काढतात.गवळी समाजातर्फे रेड्यांची पूजा केली जाते.तोफखान्यात  ही अनोखी प्रथा शहराच्या मध्यभागी ३० वर्षपासून  पाळली जात आहे.

रंगवलेली शिंगे,गळ्यात घुंगरमाळा,पाठीवरती नक्षीकाम, मानेवर मोरपंखांचा पिसारा अशा रूपात नटलेल्या हेल्यांमुळे सगर महोत्सव लक्षवेधी ठरला.दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.परंतु मागील दोन वर्षे कोविडमुळे उत्सव साजरा करण्यात आला नाही त्यामुळे यावर्षी उत्साह मोठा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here