खोटं बोलून राजकारण करणं हा आमचा धंदा नाही-अॅड.शिवाजीराव काकडे
शेवगाव प्रतिनिधी : खोटं बोलून राजकारण करणं हा आमचा धंदा नाही. जे काम मंजूर आहे त्याच कामाचे नारळ फोडून कामाचा शुभारंभ आम्ही करतो. उगाचच पोतेभर नारळ फोडून आम्ही पुढेजात नाही असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड.शिवाजीराव काकडे यांनी थाटे येथे केले.
आज दि.(२५) रोजी जि.प.सदस्या सौ हर्षदाताई काकडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ अंतर्गत मौजे थाटे ते केदार वस्ती या रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी १५ लक्ष मंजूर झाले आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच मनसुख केदार हे होते तर कार्यक्रमासाठी ह.भ.प.रामनाथ महाराज शास्त्री, जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे, प्रा.सखाराम घावटे, उपसरपंच बाबासाहेब मारकड चेडेचांदगावचे सरपंच भाऊसाहेब कणसे, हरिश्चंद्र निजवे, शिवाजी कणसे, परमेश्वर गोंधळी, रामेश्वर चेडे, बाबासाहेब गोंधळी, योगेश देशमुख, नवनाथ खेडकर, मारुती वाघ, जालिंदर घावटे, सखाराम कसबे, कल्याणराव ससाणे, पांडुरंग चव्हाण, भाऊसाहेब निजवे, शंकर हुंबे आदी यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना अॅड.काकडे म्हणाले की, आम्ही खोटे आश्वासन देत नाही कापूस उत्पादकांसाठी काही ना काही करणार सांगितले होते त्यानुसार कापूस उत्पादकांसाठी मोठा प्रकल्प उभा केला आहे. माझे स्वप्न मोठे आहे. ध्येय वेड होऊन काम केलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मी कोणत्याही पक्षात नाही सर्वसामान्य जनता हाच माझा पक्ष आहे. या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणारे मी अनेक पाहिले त्यामुळे पक्षाच ओझं घेऊन मी चालत नाही असेही ते बोलताना म्हणाले.
सौ काकडे म्हणाल्या की, यापूर्वीही या रस्त्याच्या खडीकरण कामासाठी निधी दिला होता. आता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आपण करत आहोत. पावन गणपती संस्थान देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात सामावेश होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रत्येक गावात काही ना काही देण्याचा माझा प्रयत्न असतो असेही त्या बोलताना म्हणाल्या.
यावेळी सोमनाथ केदार, नामदेव जायभाये, मिनिनाथ केदार, गोरक्ष केदार, पप्पू केदार, राजेंद्र केदार, ब्रम्हदेव केदार, सुनील केदार, दादासाहेब सातपुते, पोपट केदार, जालिंदर केदार, सतीश केदार, बाबासाहेब ढाकणे, नवनाथ शिरसाठ आदि यावेळी उपस्थित होते.
(ह.भ.प. रामनाथ महाराज शास्त्री, मठाधिपती, पावन गणपती संस्थान थाटे).
काकडे दाम्पत्य नेहमी लोकाभिमुख काम करत असतात. यापूर्वीदेखील या रस्त्याचे खडीकरण केले होते व आता डांबरीकरण होत आहे. चिखला पाण्यातून ते आपल्यासाठी आले आहेत त्यांच्या या प्रेमाला जागृत रहा.