दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनसाठी जाणाऱ्या शहरातील धावपटूंचा सत्कार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनसाठी जाणाऱ्या शहरातील धावपटूंचा सत्कार

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा

नगरचे धावपटू दक्षिण आफ्रिकेतही शहराचे नाव उंचावतील – संजय सपकाळ

अहमदनगर (प्रतिनिधी) – जगातील सर्वात जुनी व अवघड असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनसाठी रवाना होणारे शहरातील धावपटू गौतम जायभाय, योगेश खरपुडे, जगदीप मक्कर व रवी पत्रे यांचा हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सत्कार करुन मॅरेथॉनसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

भिंगारच्या भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क येथे हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी धावपटूंचा सत्कार केला. यावेळी संजय सपकाळ, दिलीपराव ठोकळ, सुमेश केदारे, मनोहर दरवडे, दीपक धाडगे, अविनाश पोतदार, अशोकराव पराते, अविनाश जाधव, सर्वेश सपकाळ, सचिन चोपडा, सुभाष पेंढुरकर, रमेश वराडे, विकास भिंगारदिवे, नामदेवराव जावळे, अशोक दळवी, जालींदर अळकुटे, नवनाथ वेताळ, अभिजीत सपकाळ, अशोक लोंढे, सखाराम अळकुटे, सुंदरराव पाटील, विलासराव तोतरे, विठ्ठल राहिंज, राजू कांबळे, आसाराम बनसोडे, एकनाथ जगताप, शेषराव पालवे, दिनेश शहापूरकर, दिलीप बोंदर्डे, विशाल बोगावत, संतोष लुणिया, रमेश कोठारी, कुमार धतुरे, रुपेश झोडगे, रामदास घडसिंग, प्रकाश भिंगारदिवे, विकास निमसे, अजय खंडागळे, शिवांश शिंदे, भाऊसाहेब गुंजाळ, आदिनाथ वैराळ, विशाल भामरे, उंडे मेजर, भरत डंगोरे आदी उपस्थित होते.

संजय सपकाळ म्हणाले की, शहरात खेळातून आरोग्याप्रती जागरुकता निर्माण होत आहे. नागरिकांचा देखील मैदानावर येण्याचा कल वाढत आहे. निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी मैदानी खेळाची गरज निर्माण झाली आहे. जागतिक दर्जाच्या मॅरेथॉन स्पर्धेत नगरचे धावपटू शहराचे नाव उंचावणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, उद्योजक गौरव फिरोदिया व अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी धावपटूंना कॉम्रेड्स मॅरेथॉनसाठी शुभेच्छा दिल्या.

कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धा डर्बन ते पिटर्स मॅरिअटझबर्ग या दोन शहराच्या 86 किलोमीटरच्या खडतर अंतरादरम्यान होणार आहे. यामध्ये भारत देशातूनही मोठ्या संख्येने धावपटू सहभागी होणार आहेत. खरपुडे, मक्कर, जायभाय हे जिल्ह्यासाठी प्रथमच स्पेशल बॅक टू बॅक कॉम्रेड्स फिनीशर पदक आणण्याचे स्वप्न घेऊन जात आहेत. त्यांनी 2023 ला मॅरेथॉन पूर्ण करून मेडल मिळवले होते. कॉम्रेड्स मॅरेथॉनला सलग दोन वर्ष सहभाग नोंदविल्यास स्पेशल ॲप्रिसिएशन मेडल दिला जातो. सोबत रवी पत्रे हे त्यांच्या पहिल्या मॅरेथॉनसाठी जात आहेत. या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा संकल्प चारही धावपटूंनी व्यक्त केला.

या मॅरेथॉन स्पर्धेला वैभवशाली इतिहास असून, 1921 मध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. दरवर्षी ही स्पर्धा पहिल्या महायुध्दातील सैनिकांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात येते. या मॅरेथॉनचे हे 97 वे वर्ष आहे. शारीरिक क्षमतेचा कस लावणाऱ्या व कमी-अधिक तापमानाचा मोठा प्रभाव असलेल्या या स्पर्धेत रनर्सला स्वत:ला सिध्द करावे लागणार आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!