भाजपात प्रादेशिक घटकांनाही सामावून घेतले जाते – भैय्या गंधे
अहमदनगर प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वधर्मियांचा समावेश असल्याने कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करतांना प्रादेशिक घटकांनाही आपल्यामध्ये सामावून घेतले जाते.यासाठी प्रत्येक प्रदेश पातळीवर अशा लोकांचे संघटन भाजपाच्यावतीने करण्यात येत आहेत.
नगरमध्येही अनेक प्रांतातील लोक या ठिकाणी नोकरी- व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत.त्यांचे संघटन करुन त्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी भाजपाने नेहमीच पुढाकार घेतला आहे.आता दक्षिण भारतीय आघाडीच्या माध्यमातून समाजात चांगले काम करणार्यांचे संघटन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होणार आहे.
नुतन पदाधिकारी हे सामाजिक दायित्व जपणारे असल्याने आता त्यांना भाजपा पक्षाचे बळ देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू,असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.
नगर शहर जिल्हा भाजप दक्षिण भारतीय आघाडीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष पार्थन पिल्लाई,शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे,संघटन सरचिटणीस अॅड.विवेक नाईक,बी.राजू लक्ष्मण,श्री.शेट्टी,श्री.माटी,वसंत सिंग, प्रेम शेट्टी,कांता वेलू आदि उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे – अध्यक्ष-वसंतसिंग शंकरनारायण तीरूमपल्ली, उपाध्यक्ष-प्रेमजिथ विश्वजन्य शेट्टी,सरचिटणीस-थांगवेल चिन्नस्वामी,शिवकुमार गोविंद स्वामी,खजिनदारपदी-लोकेश शेट्टी,कार्यकारिणी सदस्य-हनुमंत पवार,सुरेश शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी नूतन अध्यक्ष वसंत सिंग म्हणाले,गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही दक्षिण भारतीय नगरमध्ये राहत असून,आता आम्ही नगरकरच झालो आहेत.दक्षिण भारतीय परंपरा,उत्सव,सण-समारंभप्रसंगी एकत्र येऊन भारतीय संस्कृतीचे दर्शन या निमत्त घडवत असतो.
त्याचबरोबर शहरातील सामाजिक कार्यातही आम्ही सदस्य सक्रीय सहभाग देत आहोत.आता पक्षाच्या माध्यमातूनही विविध उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मल्हार गंधे,सिद्धेश नाकाडे,अभिषेक वराळे, चिन्मय खिस्ती,हुझेफा शेख, रवींद्र काकडे,कैलास ठुबे, माणिकराव जपे,ऋग्वेद गंधे यांसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेव पदाधिकारी उपस्थित होते.