दलित पॅंथरने दिला महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा

- Advertisement -

दलित पॅंथरने दिला महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा

नगर (प्रतिनिधी)
महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना महाराष्ट्रातील दलित पॅंथर संघटनेने जाहिर पाठिंबा दिल्याचे पत्र दलित पॅंथरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. त्याच बरोबर डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी नगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते सक्रीय झाले असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे अहिल्यानगरच्या दक्षिण मतदार संघातून लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. त्यांना विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. त्याता दलित पॅंथरने पाठिंबा जाहिर केल्याने त्यांचे निवडणुकीतील बळ वाढले असून त्यांचा विजयाचा मार्ग अधिक सुखकर झाला आहे.
पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी दलित पॅंथरच्या रुपाने राज्यात आंबेडकरी विचारांची चळवळ उभी केली. यामुळे फुले शाहू आणि आंबेडकर यांचे विचार पुढे घेवून जाणाऱ्या महायुती सरकार नक्की प्रयत्न करेल असा आमचा विश्वास आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी दलित पॅंथर सर्वोतपरी प्रयत्न केले जाणार आहेत. असे दलित पॅंथरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी सांगितले. दलित पॅंथरच्या या भुमिकेमुळे महायुतीच्या उमेदवारांना त्याचा मोठा फायदा होईल अशा विश्वास सुद्धा सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केला.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!