काठाळवेढा व डोंगरवाडी भागातील वर्ग दोन च्या जमिनीची लागवडीखाली नोंद लावून शासकीय योजना पिक विमाचा लाभ मिळण्याची मागणी.
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील काठाळवेढा व डोंगरवाडी येथील अनेक भूमिहीन मजुरांना शासनामार्फत वर्ग दोन च्या जमिनी शेती करून उदरनिर्वाह करण्यासाठी मिळालेल्या होत्या त्यावर शेती करून अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात. यामध्ये पीक पाण्याची नोंद लावण्यात आली होती. त्यावर शासनामार्फत शेतीसाठी असलेल्या अनेक योजनांचा लाभ देखील शेतकऱ्यांना मिळत होता. शेती व सोसायटी देखील मिळत होती. तसेच काही नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यावर पिक विमा देखील मिळत होता. परंतु ऑनलाईन नोंदणी झाल्यापासून सर्व शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर लागवडीस अयोग्य क्षेत्र अशी नोंद लागलेली आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याही सुविधा मिळत नाही.
शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर पोट खराब क्षेत्र लागवडीस अयोग्य क्षेत्र असे दिसते. परंतु जमिनी सध्या स्थितीमध्ये लागवडी योग्य आहेत त्यामध्ये पीक घेऊन सर्व शेतकरी त्याचा वापर करतात तसेच गेल्या 40 ते 50 वर्षापासून या शेतामध्ये शेतकरी पिक घेत आहे. परंतु ऑनलाईन झाल्यापासून सर्वांच्या उताऱ्यावर लागवडीस अयोग्य क्षेत्र अशी नोंद आल्यामुळे त्या शेतकऱ्यांना कोणतेही शासकीय लाभ तसेच पिक विमा मिळत नाही.या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीची लागवडीस योग्य अशी उताऱ्यावर नोंद करून त्यांना सर्व शासकीय योजना पिक विमाचा लाभ मिळण्याच्या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी दलित महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संजय चांदणे, प्रदेश अध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, कडूबाबा लोंढे,वृषाली डोंगरे, संपत गुंड,रंगनाथ वायदंडे, गंगाधर गुंड, बाळू गुंड, संभाजी गुंड, महादू गुंड, दिपाली लामखडे, शरद वाळुंज, राहुल वाळुंज, म्हातारबा खाटाटे, उमाजी भाईक, सरुबाई उचाळे, उस्मान शेख, चांदभाई शेख, जब्बार शेख, जवाहर पठाण, उमराव पठाण रामदास दिवेकर, दत्तू भाईक आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीची लागवडीस योग्य अशी उताऱ्यावर नोंद करून त्यांना सर्व शासकीय योजना पिक विमाचा लाभ मिळण्यासाठी व लवकरात लवकर त्यांच्या लागवडीस योग्य क्षेत्र असल्याची नोंद सातबारा उतारा वर लावावी अन्यथा दलित महासंघाच्या वतीने सर्व शेतकरी समवेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे..