दहावीच्या परीक्षेत सृष्टी चिंतामणी 94 टक्के गुण
नगर – नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाला मध्ये नगरची सृष्टी पंकज चिंतामणी या विद्यार्थिनीने 94.20% गुण मिळवून सुयश संपादन केले.
सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूल मधील सृष्टी ही इंग्रजी माध्यमातून एसएससी ची परीक्षा दिली या परीक्षेत तिला 500 पैकी 471 गुण पडले. सर्व विषयात 90 पेक्षा जास्त मार्क तिला मिळाल्याने तिचे सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. या परीक्षेसाठी सृष्टीला आई, वडील, शाळेच्या मुख्याध्यापिका गीता तांबे, कंचन पापडेजा ,सीमा कोटस्थाने, सुवर्णा मुळे, मथुरा केळकर,आशिष टटटू , आदींचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल सराफ व्यावसायिक नांदुरकर, डहाळे परिवाराने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.