दहा विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अशोकभाऊ फिरोदिया स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश


अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी शाळेच्या निकालाची उज्ज्वल परंपरा या वर्षीही कायम राखली असून, जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत दहा विद्यार्थ्यांनी स्थान पटकाविले आहे.

इयत्ता 5 वी च्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 5 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यामध्ये समर्थ सुनिल नानेकर, संस्कार नितीन सायंबर, संयमी आनंद गुगळे, श्रध्दा अप्पा पवार, आराध्या सोपान टिपुळे, तर इयत्ता 8 वी च्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे 5 विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यामध्ये कृष्णप्रिया जगदाळे, प्रज्ञा भक्कड, गार्गी जोशी, अक्षरा झंवर, नित्यश्री साळुंके यांनी यश मिळवले आहे.

या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया व खजिनदार प्रकाश गांधी यांनी सत्कार केला. यावेळी प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला, माध्यमिक विभाग प्रमुख वैशाली वाघ, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा उपाध्ये आदी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या अध्यापकांचे संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया यांनी अभिनंदन केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!