दादाचौधरी विद्यालयातर्फे सेनापती दादा चौधरी यांची पुण्यतिथी साजरी

0
79
????????????????????????????????????

दादा चौधरी यांचे कार्य प्रेरणादायी – प्रा.शिरीष मोडक

अहमदनगर प्रतिनिधी – थोर स्वातंत्र्य सेनानी कै.दादा चौधरी यांनी अनाथ विदयार्थ्यांनी शिक्षण घ्यावे यासाठी राष्ट्रीय पाठशाळा व राष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली.दादा चौधरींनी प्रसंगी तुरुंगवास भोगला. सत्याग्रहाचे नेतृत्व केले.लोकमान्य व नवशक्ती वृत्तपत्राचे संपादन केले.शिक्षणासाठी त्यांची तळमळ होती.दादा चौधरी यांचे कार्य प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी केले.                        

हिंदसेवा मंडळाच्या दादा चौधरी विद्यालयातर्फे सेनापती कै.कृष्णाजी नरहर तथा दादा चौधरी यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील स्वातंत्र्य सेनानी कै.दादा चौधरी व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच राष्ट्रीय पाठशाळेतील स्वातंत्र्य सेनानी दादा चौधरी यांच्या समाधीस्थळी हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा,दादा चौधरी विद्यालयाचे चेअरमन अँड सुधीर झरकर,मराठी शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी,मेहेर इंग्लिश स्कुलचे चेअरमन जगदीश झालानी,सेवक प्रतिनिधी विठ्ठल ढगे,दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर साबळे,दादा चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले,भाईसथा नाईट स्कुलचे प्राचार्य सुनील सुसरे,पार्वतीबाई डहाणूकर विद्यालया च्या मुख्याध्यापिका सौ.रोहिणी फळे,मेहेर इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी, सहायक सचिव बी यु कुलकर्णी,,दीपक आरडे,नितीन केणे,अजय महाजन,विजय राहिंज,नंदे प्रसाद,दिनेश मूळे,दीपक शिंदे,प्रशांत शिंदे,दिलीप परसपाटकी,शिवाजी भोंडवे,मनोज हिरणवाळे,मोहन जाधव आदी उपस्थित होते.                         

सूत्र संचालन नितीन केणे यांनी केले तर आभार दीपक शिंदे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.                        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here