दामोदर विधाते विद्यालयाचा दहावी बोर्डात 100 टक्के निकाल
5 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण
अहमदनगर (प्रतिनिधी) – सारसनगर येथील जनकल्याण शिक्षक प्रसारक मंडळ संचलित कै. दामोदर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी उत्तमप्रकारे गुण मिळवून यश संपादन केले.
विद्यालयाच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक- पायल आदिनाथ सानप (85.80 टक्के), द्वितीय क्रमांक- अनिकेत अशोक गोरे (82.60 टक्के), सायली सुनील पोकळे (80.60 टक्के), चौथा क्रमांक- वैष्णवी नामदेव गीते (78 टक्के), पाचवा क्रमांक- महेश भाऊसाहेब केदार (75 टक्के) येण्याचा बहुमान पटकाविला आहे.
विद्यालयातील 40 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेत बसले होते. त्यापैकी 5 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, 12 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 17 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 6 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांना सारिका गायकवाड, अमोल मेहेत्रे, सचिन बर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आमदार संग्राम जगताप, संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब (अण्णा) विधाते, प्रा. माणिक विधाते, संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजी विधाते, विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष सुसे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के यांनी अभिनंदन केले.