दिलदारसिंग बीर पुन्हा शिवबंधनात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत दिलदारसिंग बीर यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बीर यांनी शिवबंधन बांधले.
नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांनी काढलेल्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेची नगर शहरात गांधी मैदानावर सांगता झाली. या कार्यक्रमात बीर यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी महाविकास आघाडीचे शरद पवार, बाळासाहेब थोरात, रोहित पवार, विक्रम राठोड, माजी आमदार राजेंद्र आवळे, भूषणसिंह होळकर, राजेंद्र फाळके, भगवान फुलसौंदर, प्रताप ढाकणे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, किरण काळे, दत्ता जाधव आदी उपस्थित होते.
दिलदारसिंग बीर यांनी माजी मंत्री स्व. अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करुन आपल्या सामाजिक व राजकीय कारकीर्दची सुरुवात केली. 26 जानेवारी 2002 रोजी बागडपट्टीत पहिली शिवसेनेची शाखा सुरु केली.
त्याचप्रमाणे बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु केले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून बीर यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवून सर्वसामान्य नागरिक व युवकांशी जोडले गेले. तर शिवसेनेत शाखाप्रमुख ते उपशहरप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी अनेक सामाजिक प्रश्न हाताळून शिवसेना वाढविण्याचे काम केले.
2013 मध्ये ते राष्ट्रवादीत गेले. 10 वर्ष राष्ट्रवादीत शहर जिल्हा उपाध्यक्ष व सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली. मात्र पुन्हा त्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शिवसेनेत केलेल्या प्रवेशाचे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून स्वागत होत आहे.
शिवसेनेत पुन्हा सन्मानाने काम करण्याची संधी मिळाली आहे. पूर्वीपासूनच स्व. अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक म्हणून कार्य केले. राजकारण व समाजकारणाच्या कार्याला शिवसेनेत दिशा मिळाली व मोठा जनसंपर्क निर्माण झाला. ज्या शिवसेनेतून सुरुवात झाली, त्या शिवसेनेतच शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करत राहणार. -दिलदारसिंग बीर
- Advertisement -