अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ४ हजार ७४ कोटी रुपयांच्या रस्त्यांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला.या कार्यक्रमात दिलीप गांधी यांनी केलेल्या प्रयत्नांची नितीन गडकरी यांनी आठवण काढली.
या कार्यक्रमात भाषण करताना नितीन गडकरी यांनी सांगितले की,अहमदनगर शहराच्या उड्डाणपूल कामासाठी दिलीप गांधी ८ ते १० वेळा मला दिल्लीत भेटले.या कामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते व्हावे ही त्यांची इच्छा होती.मात्र ती माझ्याकडून पूर्ण होऊ शकली नाही,असे गडकरींनी सांगितले.
या कार्यक्रमानंतर नितीन गडकरी यांनी दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जावून गांधी परिवाराची भेट घेतली. स्व.गांधी यांच्या फोटोस अभिवादन केले.दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज गांधी, देवेंद्र गांधी, सुवेंद्र गांधी व स्वानंद नवसारीकार यांच्याशी त्यांनी संवाद साधला.या प्रसंगी माजी मंत्री राम शिंदे, शिवसेनेचे विक्रम राठोड आदींसह मोठ्यासंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गडकरी म्हणाले,माझे स्नेही असलेले दिलीप गांधी यांनी खूप मोठे विकास कामे केली आहेत.विशेषतः नगरच्या उड्डाणपुलासाठी व रस्त्यांच्या कामासाठी त्यांचा वारंवार पाठपुरावा माझ्याकडे होता.त्यांनी सुचवलेले सर्व कामे मी पूर्ण करून त्यांचे विकासकामांचे स्वप्न मी पूर्ण करणार आहे.मात्र झालेला हा विकास पाहण्यास ते आपल्यात नाहीत.गांधी परिवाराच्या व सुवेंद्रच्या मी कायम पाठीशी असणार आहे.