अहमदनगर – नगर येथील नगर जिल्हा परिषद येथील शिक्षण विभागातील कर्मचारी आणि दिव्यांग क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते स्वतः अंध असूनही अनेकांचे मार्गदर्शक, स्वर सूर्य महेश चंद्रकांत भागवत याचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने आज दिनांक 1 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी नगर येथील साई दीप हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 56 वर्ष होते.
त्यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार अहमदनगर येथील अमरधाम येथे आज सायंकाळी 7 वाजता करण्यात येणार आहेत. दिवंगत महेश भागवत यांचे पार्थिव अंत्यदर्शनाकरिता सायंकाळी 5 ते 6 वाजता च्या दरम्यान महेश सदन,सिद्धिविनायक कॉलनी, सावेडी, रेणाविकर विद्या मंदिर समोर ,सावेडी ,अहमदनगर येथे ठेवण्यात येणार आहे*.
त्यांचे मागे त्यांचा मुलगा ओमकार, मुलगी सुनयना, जावई, नातवंडे, पत्नी, बंधू योगेश व ज्ञानेश त्यांचे सर्व भागवत कुटूंबीय, दिव्यांग मित्र परिवार आहेत.
महेश सर यांच्या निधनाने संगीत ,सामाजिक,शैक्षणिक, दिव्यांग क्षेत्राची न भरून निघणारी हानी झाली आहे.