दुर्गाष्टमीच्या निमित्ताने राशीन येथील जगदंबा देवीच्या मंदिरामध्ये अलंकार पूजा संपन्न

0
95

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

कर्जत तालुक्यातील राशीन येथे काल शनिवारी शुक्ल दुर्गाष्टमीच्या निमित्ताने जगदंबा देवीच्या मंदिरामध्ये अलंकार पूजा करण्यात आली.
राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणारे कर्जत तालुक्यातील राशीन येथील जगदंबा देवी मंदिरामध्ये काल शनिवारी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल दुर्गाष्टमी निमित्ताने जगदंबा देवीची आनंदकार पूजा करण्यात आली.
यानिमित्ताने भाविक देखील दर्शनासाठी आले होते.या महिन्यांमध्ये असणारी ही शुक्ल दुर्गाष्टमी अतिशय पवित्र मानली जाते.कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तीर्थ क्षेत्र असणाऱ्या राशीन येथील जगदंबा देवीचे मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आले.
दसऱ्याच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात या ठिकाणी भाविकांनी दर्शन घेत पालखी सोहळा साजरा केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here