देवगड फाटा ते श्री क्षेत्र देवगड ५ कि.मी. अंतराच्या ५ कोटीच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न

0
143

नेवासा प्रतिनिधी – (काकासाहेब नरवणे)
५ कोटीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उदघाटन आज आपण आदरणीय भास्करगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

देवगड फाटा ते श्री क्षेत्र देवगड हा माझ्या घरचा रस्ता असून शासकीय अधिकारी यांनी आदरणीय महाराजांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली व्यवस्थित लक्ष घालून पूर्ण करावा नामदार शंकरराव गडाख यांनी यावेळी सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

आपल्या नेवासा तालुक्यासाठी जवळपास ३०० ते ३५० किमी रस्त्याचे कामांचा प्लॅन आम्ही तयार केला असून येणाऱ्या काळात शासन स्तरावरून मंजूर करून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

या कार्यक्रम प्रसंगी ह.भ.प. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज,ह.भ.प.रामनाथ महाराज पवार,मुळा कारखाना चेअरमन नानासाहेब तुवर, व्हा.चेअरमन कडूनाना कर्डिले, पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, जिल्हा परिषद, सदस्य पिंटू शेळके, मुळा कारखाना मा.व्हा चेअरमन भाऊसाहेब पा मोटे, शिवसेना तालुका अध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के,मुळा कारखाना संचालक बाळासाहेब पाटील,कैलास झगरे प.स.सदस्य,रवि शेरकर प.स.सदस्य,हरिभाऊ शेळके,बजरंग विधाटे, डाॅ.अशोकराव ढगे, अॅड.अण्णासाहेब अंबाडे,अॅड.काका गायके,प्रभाकर कोलते,श्रीरंग हारदे, कार्यकारी अभियंता श्री चव्हाण,सहाय्यक कार्यकारी अभियंता कोकरे, शाखा अभियंता खामकर व परिसरातील सरपंच,उपसरपंच सोसायटीचे चेअरमन,व्हाईस चेअरमन,सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here