धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास काव्य संग्रहाची भेट

- Advertisement -

धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास काव्य संग्रहाची भेट

कथा व काव्य संग्रहातून जीवनातील संघर्षाला प्रेरणा मिळते – सरोज आल्हाट

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास कवयित्री सरोज आल्हाट यांनी स्वत: लिहिलेल्या महिलांच्या संघर्षमय जीवन प्रकट करणारा अनन्यता काव्य संग्रहाचा संच भेट दिला. वाचनालयाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांच्याकडे पुस्तके सुपुर्द करण्यात आले.

सरोज आल्हाट म्हणाल्या की, कथा व काव्य संग्रहातून जीवनातील संघर्षाला प्रेरणा मिळत असते. वाचन संस्कृती लोप पावली जात असताना युवक-युवतींमध्ये अपयश पचविण्याची व आयुष्यातील संकटांना तोंड देण्याची क्षमता कमी होत चालली आहे. वाचनाने मन समृध्द होऊन मनुष्याला स्फूर्ती मिळत असते. अनन्यता काव्य संग्रह जीवनातील संघर्ष असून, या काव्य संग्रहातून ग्रामीण भागातील युवक-युवतींना प्रेरणा मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पै. नाना डोंगरे म्हणाले की, माहिती अनुभव, ज्ञान व शहाणपण पुस्तकंच देतात. पुस्तकांनी माणुस घडतो, व्यक्ती म्हणून त्याचा विकास होतो. सुसंस्कारीत समाज निर्मितीसाठी वाचन आवश्‍यक आहे. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न वाचनालयाच्या माध्यमातून सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles