पोलीस महासंचालकांना विहिपचे निवेदन
अहमदनगर प्रतिनिधी – अमोल भांबरकर
त्रिपुरा येथील कथित घटनेच्या निषेधार्थ दि.१२ नोव्हेंबर रोजी रजा अॅकेडेमी व अन्य सहा संघटनांच्या नेतृत्वात अमरावती,मालेगाव,नांदेड या शहरात मोर्चा काढण्यात आले.हा सुनियोजित षड्यंत्राचाच भाग आहे.असे विश्व हिंदू परिषदेचे ठाम मत आहे.स्वतःला हिंदुत्व वादी म्हणवणारे मुख्यमंत्री असतानां असे घडणे अनाकलनीय आहे.
त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेला घेऊन फक्त महाराष्ट्रात का दंगली होतात? याबाबतीत वर्तमान सरकारची मूक संमती आहे का?या सर्व घटनांची विश्व हिंदू परिषद कठोर निंदा करते.याबाबत कुठलीही हलगर्जी न करता कायदा व सुव्यस्थेची अंमलबजावणी करुन कठोर शासन करावे.अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे मुंबई क्षेञीय मंञी शंकर गायकर यांनी केली.
३०,००० ते ४०,००० धर्मांध जिहादींचा जमाव पूर्ण तयारी निशी एकत्र येऊन कायदा हातात घेऊन हिंसाचार करतात आणि शासन व प्रशासन शांत राहून सर्व सहन करते.याचा थेट संबंध सरकार पुरस्कृत हिंसाचार असा होऊ शकतो.एवढा जमाव एकत्र येतो आणि प्रशासनाला आणि शासनाला याची माहिती नसणे.यात गुप्तचर विभागाचे मोठे अपयश आहे.
हिंदु समाजाचा पोलिस प्रशासनावर विश्वास असुन सर्वतोपरि सहकार्य करण्यास तयार आहे.राजकीय नेत्यांवर व सरकारवर अजिबात विश्वास नसल्याने दंगेखोर समाज कंटकावर कठोर कारवाई करुन महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राहिल.असे कठोर पावले उचलुन दोषींना त्वरित अटक करावी.अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे मुंबई क्षेञीय मंञी शंकरजी गायकर यांनी केली.
महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे षडयंञ करणार्या जिहादी धर्मांधावर कठोर शासन करावे.अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक(डि.जी.पी)संजय पांडे यांना विश्व हिंदु परिषदेतर्फे देण्यात आले.
याप्रसंगी क्षेञीय मंञी शंकर गायकर, कोकणप्रांत गौरक्षण परिषदेचे सदस्य अशोक जैन व राजेंद्र पाटील उपस्तिथ होते.
तीनही मोर्चात जमाव अनियंत्रित झाल्याने शहराच्या मुख्य मार्गावरील अनेक ठिकाणी तोडफोड व दगडफेक करण्यात आली.औषधी दुकाने,कृषि सेवा केंद्रे यासह अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली.काही व्यापार्यांवर तसेच पोलिसांवर,अधिकाऱ्यांवर हल्लाही चढविण्यात आला.यात अनेकजण जखमी झाले आहेत.
यावरून सरकारला महाराष्ट्राचा बंगाल करण्याचा डाव असल्याची तसेच शासन या सर्व घटनांचे मूक समर्थक असल्याची भावाना आमची झाली आहे.
हे शांतताप्रिय हिंदू समाजाला वेठीस धरण्याचे व नुकसान पोहचविण्याचे षड्यंत्र आहे.शासन व प्रशासनाने वेळीच सावध व्हावे.विश्व हिंदू परिषद,बजरंग दल या गोष्टीचा तीव्र निषेध करीत आहे.शासन व प्रशासनास इशारा देत आहे.की धर्मांध जिहादींना योग्य शासन करून धडा शिकवावा.अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे.
तसेच हिंसाचाराशी संबंधित धर्मांध जिहादी संघटनांकडून झालेल्या नुकसानाची वसूली करून या हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या सर्वांना नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा.
मालेगाव,अमरावती,नांदेड हे मीडिया दाखवले त्यामुळे माहीत झाले.असे दिसते,परंतु अनेक जिल्ह्यातील तालुक्यात याबाबत बंद पाळण्यात आला,मुंबई महानगरात जवळपास २४ वस्ती ठिकाणी बंद दडपशाही करून पांळाव्यास भाग पाडले,म्हणून आम्ही मागणी करतो.की सदर हे दंगे सुनियोजित असून संपूर्ण महाराष्ट्र यात होरपळून निघेल.महाराष्टातील कायदा व सुव्यवस्था मोडकळीस आल्यास याला सरकार जबाबदार राहिल.