तिळवण तेली समाज ट्रस्टच्या मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
अहमदनगर प्रतिनिधी – दाळ मंडई,विठ्ठल रुख्मिणी मंदिरात तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने सालाबादप्रमाणे नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नऊ दिवस देवीची रुपे साकारण्यात येत आहेत.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनंदिन पुजा-आरती
शनिवार दि.9 रोजी दु.3 वा. कुंकुमार्चन कार्यक्रम,रविवार दि.10 रोजी माता की चौकी हा कार्यक्रम होणार आहे.सोमवार दि.11 रोजी शेषशाही अलंकार पुजा, मंगळवार दि.12 रोजी भवानी तलवार नित्योपचार पूजा, सामुहिक सप्तपदी पाठ, बुधवार दि.13 रोजी महिशासुर मर्दिनी अलंकार पुजा,वैदीक होमास प्रारंभ, गुरुवार दि.14 रोजी महानवमीनिमित्त सकाळी व सायंकाळी विशेष आरती.शुक्रवार दि.15 रोजी विजया दशमीनिमित्त सायंकाळी सिमोलंघन आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच दररोज दुपारी 4 वा.सरस्वती भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल.सायंकाळी 7 वा.देवीची संबळ वादनावर आरती करण्यात येत आहे,अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सागर काळे यांनी दिली.
हा नवरात्रौत्सव यशस्वीतेसाठी ट्रस्टचे उपाध्यक्षा निता लोखंडे, सचिव सचिन शेंदूरकर, खजिनदार प्रकाश सैंदर, विश्वस्त प्रसाद शिंदे,गोकूळ कोटकर,दत्तात्रय डोळसे, मनोज क्षीरसागर,शशिकांत देवकर,शोभना धारक आदि पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
दररोज देवीची सजावट व पुजा रामभाऊ माकुडे हे करत आहेत.कोरोना नियमांचे पालन करुन कार्यक्रमांचे नियोजन केले असल्याचे उपाध्यक्षा निता लोखंडे यांनी सांगितले.