नगरपंचायतच्या ३५ सफाई कर्मचाऱ्यांना सौ.सुनीताताई गडाख यांच्या हस्ते जीवन विमा संरक्षक कार्डचे वाटप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नामदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण एकोप्याने काम करतात यामुळे शहराला भरीव निधी उपलब्ध– सौ.सुनीताताई गडाख

नेवासा(प्रतिनिधी) – नामदार शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने नेवासा नगरपंचायतच्या ३५ सफाई कर्मचाऱ्यांना जीवन विमा संरक्षक कार्डचे वाटप पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.सुनीताताई गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.नेवासा येथील युवा विधी तज्ञ अँड.जावेद इनामदार यांच्या पुढाकाराने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.नामदार गडाख साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण काम करतात यामुळे शहराला भरीव निधी उपलब्ध होत असून गावच्या विकासासाठी असेच एकोप्याने काम करा असे आवाहन सौ.सुनीताताई गडाख यांनी यावेळी बोलतांना दिली.

नेवासा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.सुनीताताई गडाख हया होत्या.नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ,बहुजन समाजाचे नेते पोपटराव जीरे,नगरसेविका सौ.अंबिका ईरले,विधी तज्ञ सौ.सोनल वाखुरे पाटील,अँड.भाऊसाहेब वाघ, अंबादास ईरले,नगरसेवक संदीप बेहळे,रणजित सोनवणे, जितेंद्र कु-हे,असिफ पठाण यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक अँड.जावेद ईनामदार यांनी आलेल्या प्रमुख अतिथींचे नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे स्वागत केले.प्रास्ताविकात त्यांनी स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या हितासाठी जीवन विमा काढून त्यांना संरक्षक कार्ड नामदार शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन द्यावे म्हणून हा उपक्रम राबवला असल्याचे सांगितले.

यावेळी बोलतांना सौ.सुनीताताई गडाख म्हणाल्या की अँड.जावेद ईनामदार यांनी सफाई कामगारांसाठी राबविलेला उपक्रम स्तुत्य असा असून वाढदिवसाच्या निमित्ताने खरी भेट आम्हाला मिळाली असल्याचे सांगितले.कार्यकर्त्यांचे संघटन त्यांनी दिलेले पाठबळ यामुळेच नेवासा शहरात नामदार गडाख यांनी भरीव निधी आणला तो कार्यकर्त्यांनी दिलेल्या खारीच्या वाटयामुळेच असे ही त्यांनी बोलतांना स्पष्ट केले.

यावेळी जालिंदर गवळी, इस्माईल जहागिरदार, बच्चू बोरकर,अल्पेश बोरकर,परशुराम डौले,आयुब जहागिरदार,वसीम शेख,अमजद पठाण,हाजी जमशिद पठाण,अमृत पाटील,नितीन ढवळे,पंकज जेधे,अँड.रमेश पाठे,अँड.मयूर वाखुरे,शोएब पठाण यांच्यासह नगरपंचायतचे कामगार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी आभार मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!