नगरमध्ये उन्हाळी बॉक्सिंग प्रशिक्षण शिबिर

0
84

अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर बॉक्सिंग अकॅडमीच्या वतीने सावेडीतील गुलमोहररोड येथील स्ट्रायकर जिम मध्ये दिनांक १ ते २१ मे पर्यंत बॉक्सिंग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय बॉक्सिंग विजेता बॉक्सर गोविंद जोशी यांनी दिली आहे

पोलीस भरती,करिअर,राष्ट्रीय स्पर्धा याचबरोबर मुलींसाठी सेल्फ डिफेन्स,मेंटल व फिजिकल फिटनेस यासाठी बॉक्सिंगचा फायदा होत आहे,शिबिरामध्ये जेन्टस व लेडीजच्या वेगवेगळ्या बॅचेस असून जोशी कडून यापूर्वी अनेक प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले आहे.

शिबिरामध्ये प्रशिक्षण १७ वर्षाचा अनुभव असलेले राष्ट्रीय बॉक्सर गोविंद जोशी हे देणार असून त्यांनी १६ राष्ट्रीय स्पर्धा खेळले असून महाराष्ट्रात ५ वेळा बेस्ट बॉक्सर म्हणून किताब पटकवलेला आहे,तर अनेक संस्थांमध्ये ते प्रशिक्षक म्हणून जात असतात

बॉक्सिंग हा एक रोमहर्षक क्रीडाप्रकार. पूर्वी हा खेळ नुसत्या मुठींनी खेळत, श्रीकृष्ण-कंस, भीम-दुःशासन इत्यादींच्या मुष्टियुद्धांचे संदर्भ महाभारत काळात आढळतात.प्राचीन ग्रीसमध्ये थीरा येथील भित्तिलेपचित्रात(इ.स.पू.१५२०)मुष्टियुद्धाचे चित्रण आढळते.

१८६० च्या सुमारास क्वीन्सबरीचा आठवा मार्क्विस जॉन शॉल्टो डग्लस(१८४४–१९००)याने बॉक्सिंगच्या स्वरूपात या खेळाला अधिक नियमबद्ध करण्यास प्रांरभ केला. ‘ब्रिटिश बॉक्सिंग बोर्ड ऑफ कंट्रोल’ ने १९२९ मध्ये तयार केलेल्या नियमांनुसार हा खेळ चालतो.

मुष्टियुद्धाच्या खेळात दोन खेळाडू हातांत विशिष्ट प्रकारच्या ६ ते १० औंस वजनाच्या चामड्याच्या मुष्टी घालून परस्पंराना ठोसे देऊन,विशिष्ट वेळात हरविण्याच्या प्रयत्न करतात.आक्रमण आणि बचाव अशा दुहेरी अंगांनी त्यात खेळाडूचे कौशल्य पणास लागते.प्रत्येक नियमयुक्त ठोशास,ठोसा चुकविण्यास व खेळण्याच्या विशिष्ट प्रदर्शनीय पद्धतीस(म्हणजेच खेळाडूच्या शैलीसाठी)ठराविक गुण असतात.

ज्यांना या शिबिरामध्ये सहभागी व्हायचे असेल त्यानी स्ट्रायकर जिम,गुलमोहररोड,मर्चंट बॅंकेजवळ, नगर या ठिकाणी किंवा मो न ९४२१५८८७८९ किंवा ९८५०००५९९४ यावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here