अहमदनगर प्रतिनिधी – आनंदराज फिल्म प्रॉडक्शन, पुणे यांच्या वतीने मराठी चित्रपट बनविण्यात येणार असून त्यासाठी शनिवार दि ११ जून रोजी सकाळी १० ते दु ५ वाजेपर्यंत श्रमिक कार्यालय,टिळकरोड वाडियापार्क समोर अहमदनगर येथे ऑडिशन होणार आहे अशी माहिती कल्पना गायकवाड यांनी दिली आहे
वय वर्षे १५ वर्षावरील हौशी व प्रोफेशनल इच्छुक कलाकारांनी आपली माहिती व फोटोसह ऑडिशनला उपस्थित राहावे यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही,मुलाखती विनामुल्य आहे.
सिनेमाचे शुटींग हे नगर शहर, नेवासा,केडगाव, मांजरसुंभा व शहर परिसरात होणार आहे.तरी इच्छुकांनी उपस्थित राहावे व अधिक माहितीसाठी डायरेकटर आनंद जाधव, मो ८८८८७९७९४१ किवा कल्पना गायकवा ,मो ७८७५६४७१७६ या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन सुरेश कराळे,महेश कांबळे,अरुण बनसोडे,प्रणाली चव्हाण,हेमलता कांबळे आदींनी केले आहे.